Bjp News : भाजपचा मेगा प्लॅन तयार; बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस उतरले मैदानात

Political News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यभर सुरु आहे. महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार ठरले असले तरी अनेक मतदारसंघात महायुतीमधील नाराजी उफाळून आली आहे.
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यभर सुरु आहे. महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार ठरले असले तरी अनेक मतदारसंघात महायुतीमधील नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपसमोर मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी टाळण्याचे आव्हान आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज कोण माघार घेणार याकडे लागून राहिले आहे.

भाजपमधील बंडखोरी टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मैदानात उतरले आहेत. भाजपने ही बंडखोरी टाळण्यासाठी मेगा प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. बंडखोरांना समजावून सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. बंडखोरांना समजवण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. (Bjp News)

विधानसभा निवडणुकीचे तिकीट न दिल्याने काही नेत्यांनी बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपमधील (Bjp) बंडखोरी टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपायोजना केल्या जात आहेत. विदर्भातील बंडखोरी टाळण्यासाठी गुरुवारी रात्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीत फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बंडखोरी करणाऱ्या नाराजांची समजूत काढली.

या बैठकीनंतर बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बोरिवलीतील बंडखोर गोपाळ शेट्टींचीही देवेंद्र फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही गोपाळ शेट्टी बंडखोरी करण्यावर ठाम असल्याचे समजते त्यामुळे त्यांची समजूत काढण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Sangli Congress News : विधानसभेलाही 'सांगली पॅटर्न' कायम, विशाल पाटील सोबत असल्याने जयश्री पाटील बंडखोरीवर ठाम

दुसरीकडे महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील आहेत. प्रत्येक ठिकाणच्या बंडखोराची समजूत काढण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. शेवटचे तीन दिवस हातात असल्याने चर्चा जोरात सुरु आहे.

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Congress News : मुंबई, कोल्हापुरप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतरही बसणार काँग्रेसला धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com