Sangli Congress News : विधानसभेलाही 'सांगली पॅटर्न' कायम, विशाल पाटील सोबत असल्याने जयश्री पाटील बंडखोरीवर ठाम

Political News : सांगली विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या वाहिनी जयश्री पाटील यांनी देखील बंडखोरी केली असून पाकीट चिन्ह त्यांनी मागितले आहे.
Pruthviraj Patil, Jayshree Patil
Pruthviraj Patil, Jayshree Patil sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यभरात सांगली पॅटर्न चांगलाच गाजला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार कायम ठेवल्याने काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंड केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही विशाल पाटलांनी पाकीट चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता.

त्यामुळे आता सांगली विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या वाहिनी जयश्री पाटील यांनी देखील बंडखोरी केली असून पाकीट चिन्ह त्यांनी मागितले आहे. त्यामुळे येत्या काळात त्या निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याने काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. (Sangli Congress News)

काँग्रेसचे (Congress) प्रभारी चेन्नीथला यांनी जयश्री पाटील यांना विधान परिषदेची ऑफर दिली होती. परंतु, जयश्री पाटील यांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली असून त्या विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. या निवडणुकीत खासदार विशाल पाटील (Vishal Patil) देखील माझ्यासोबत असल्याचा निर्वाळा जयश्री पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.

येत्या 5 तारखेपासून जैसह्री पाटील या काँग्रेस कमिटीपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. जयश्री पाटील यांनी बंडखोरी मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्याला काही यश आले नाही. जयश्री पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम आहेत.

Pruthviraj Patil, Jayshree Patil
Satej Patil News : आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवणे म्हणजे गोपनीयतेचा भंग; सतेज पाटलांची टीका

पाकीट चिन्ह मागितले

निवडणूक आयोगाकडे त्यांनी पाकीट चिन्ह मागितलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी पाकीट चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यामुळे जयश्री पाटील यांनी देखील पाकीट चिन्ह मागितले आहे. त्यामुळे आता त्यांना कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pruthviraj Patil, Jayshree Patil
Congress News : मुंबई, कोल्हापुरप्रमाणे विधानसभा निवडणुकीनंतरही बसणार काँग्रेसला धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com