Ashish Shelar praises Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'दानपट्टा' फिरणार? 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यापूर्वीच भाजप मंत्री शेलारांनी गोंजारलं

Marathi film artists Mumbai BJP Minister Ashish Shelar Raj Thackeray : मुंबईतील मराठी सिने कलाकरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले.
Ashish Shelar praises Raj Thackeray
Ashish Shelar praises Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BJP Raj Thackeray news Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा गुढीपाडवा मेळाव्या अवघे दोन दिवसच राहिले आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राज ठाकरे कोणता 'ठाकरी प्रहार' करतात, याकडे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंचा हा 'दानपट्ट्या'पूर्वीच त्यांना भाजपकडून गोंजरण्याचा प्रयत्न होत आहेत. मुंबईतील मराठी सिने कलाकरांन गुढीपाडव्याचे औचित्य साधून भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थित मुंबईतील विशेष कार्यक्रम घेतला. अभिनेता प्रसाद ओक यांनी मंत्री शेलार यांना विचारलेल्या प्रश्नावर, राज ठाकरे यांच्याबरोबर बंद दाराआड अडकायला आवडेल, असे म्हणत गोंजारण्याचा प्रयत्न केला.

सिने अभिनेता प्रसाद ओक यांनी भाजप (BJP) मंत्री आशिष शेलार यांना तुम्ही कुणाबरोबर असे अडकलात, तर ते कोण असावे असे वाटते, असा प्रश्न केला. यासाठी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवार? असे तीन पर्याय देण्यात आले होते. त्यावर आशिष शेलार यांनी दिलेल्या उत्तराने एकच 'हास्यकल्लोळ' झाला आणि राज ठाकरेंना गोंजारण्याचा देखील प्रयत्न केला.

Ashish Shelar praises Raj Thackeray
Imran Pratapgarhi FIR : गुजरात पोलिसांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची 'सर्वोच्च' आठवण; काँग्रेस खासदार प्रतापगढींविरुद्धचा 'एफआयआर' रद्द

आशिष शेलार म्हणाले, "राज ठाकरे (Raj Thackeray) हे आमचे मित्र आहेत. त्यातही ते एक कलाकार आहेत. कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. त्यांच्याबरोबर वाद, संवाद, चर्चा-विमर्श करायला आपल्याला आवडते आणि आनंदही मिळतो. त्यामुळे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार या तिघांपेक्षा आपल्याला राज ठाकरे यांच्याबरोबर बंद दाराआड अडकायला आवडेल".

Ashish Shelar praises Raj Thackeray
Top 10 News : दिशाच्या आत्महत्येमागचे मोठे कारण समोर, कामरा धास्तावला, चाटे, केदारच्या जबाबात धक्कादायक माहिती - वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

आवडण्याचे कारण म्हणजे, त्यांच्याबरोबर नकलांपासून अकलेपर्यंत सर्व प्रकारची मेजवानी मिळते, असे मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. मंत्री शेलार यांच्या उत्तराने कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. अभिनेता स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सुव्रत जोशी, प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर, सुशांत शेलार, रिंकू राजगुरू, सुबोध भावे, आदिनाथ कोठारे उपस्थित होते.

मराठी प्रेक्षकांनी घरात अडकून न राहता मराठी चित्रपटांना पाठबळ देण्यासाठी सिनेमागृहापर्यंत यायला हवे. चित्रपट कथेतील सुखदुः‌खे पाहून स्वतःच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रेक्षक प्रयत्न करतात, असेही मंत्री शेलार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com