Presidential Election : आघाडीची मतं फुटतील ; भाजपकडून संकेत

Presidential Election 2022 | राज्यात आता महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही. त्यांच्या समन्वयाचा तर विषयच नाही," असे शेलार म्हणाले.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई :राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानास सुरवात झाली आहे. १५ व्या राष्ट्रपतींसाठी एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू (draupadi murmu)आणि विरोधकांतर्फे यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. "महाविकास आघाडीतील अनेक आमदार पक्षमर्यादा झिडकारुन द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात मतदान करतील," असा विश्वास भाजप आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Presidential Election 2022 news update)

"या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. आम्हाला रेकॉर्डब्रेक आमदारांचं समर्थन मिळेल," असे शेलार म्हणाले. "आम्हाला जी वाढीव मतं मिळतील ती इतिहास घडवणारी असतील. राज्यात आता महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही. त्यांच्या समन्वयाचा तर विषयच नाही," असे शेलार म्हणाले.

"जे रोज तोंडावर आपटले ते आता पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यसभा, विधानपरिषदेतही विरोधक हेच बोलत होते. कायदा स्पष्ट आहे, संविधान स्पष्ट आहे. ज्यांना अभ्यास माहिती आहे त्यांना माहिती आहे. हा निर्णय शिंदे गटाच्या बाजुने लागेल," असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

Ashish Shelar
Shiv sena : नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखांचा काही तासांतच राजीनामा

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) आज संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत लोकसभेचे 543 खासदार मतदान करतील तर राज्यसभेचे 233 खासदार मतदान करतील. देशभरातील 4 हजार 33 आमदारही मतदान करणार आहेत, म्हणजेच खासदार आणि आमदार संमिश्र असल्यास एकूण 4 हजार 809 सदस्य राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांसह एकूण 10 लाख 81 हजार 991 मते आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा बहुमताचा आकडा 5 लाख 40 हजार 996 आहे. मुर्मूंचा विजय निश्चित मानला जात आहे.

संसद भवनातील 63 क्रमांकाच्या खोलीत मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यांच्या विधानसभांमध्ये आमदारांना मतदान करता येणार आहे. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असून 25 जुलै रोजी राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com