Ram Mandir Opening : "22 जानेवारीला सुटी जाहीर करा" शिंदे गटाच्या नेत्यानंतर आता भाजप आमदाराचंही मुख्यमंत्र्यांना पत्र

Bjp Mla Demands Declare A Holiday On January 22 : भाजप आमदाराने मुख्यमंत्री शिंदेंना पत्र का लिहिलं?
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Maharashtra Politics Latest News : अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्रीराम मंदिरात येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी भाजपनेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडे केली आहे.

Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : महायुतीत सर्वकाही आलबेल नाही? भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण

या मागणीचे पत्र भाजप आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. 22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरेल. सुमारे 500-550 वर्षांचा संघर्ष हा श्रीराम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो रामभक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार, या दिवसाची तमाम रामभक्तांना प्रतीक्षा आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अशीच मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. ( Ram Mandir Ayodhya ) या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर करावी. तसेच खासगी आस्थापनांनाही अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

edited by sachin fulpagare

Eknath Shinde
Sanjay Raut: 'सोम्या-गोम्या'वरून अजितदादा-राऊतांमध्ये जुंपली; इतके नामर्द...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com