आधी तुमच्या गुजरात, कर्नाटकला सांगा! खासदारांनी पंतप्रधान मोदींना सुनावलं

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचे जनतेला चटके
petrol and diesel prices
petrol and diesel pricesSarkarnama
Published on
Updated on

चेन्नई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढीवरून ओरड सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आता थेट विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांकडं बोट दाखवलं आहे. यावरून तमिळनाडूतील द्रमुकचे (DMK) खासदार टी. के.एस. एळनगोवन यांनी मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. (Petrol Diesel price hike News)

आधी गुजरात आणि कर्नाटकला कर कमी करायला सांगा, असं खासदार एळनगोवन यांनी मोदींना सुनावले. ते म्हणाले की, मोदींनी विरोधी पक्षांची सरकार असलेल्या राज्यांना इंधनावरील करात कपात करण्यास सांगितली आहे. त्यांनी गुजरात आणि कर्नाटकला करात कपात करायला सांगितलेली नाही. राज्यांकडून जमा होणाऱ्या कराच्या तुलनेत केंद्र सरकारला मिळणारा कर तिप्पट आहे. केंद्र सरकार बोलतंय एक आणि करतंय एक अशी स्थिती आहे. आता मोदी सरकारला पैशांची गरज आहे म्हणून पाच ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेच्या गप्पा मारणारे सरकारी कंपन्या विकत आहेत. आर्थिक चणचण भासत असलेल्या गरीब कुटुंबासारख यांचं वागणं आहे.

petrol and diesel prices
पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? पंतप्रधान मोदींनीच आता सुचवला उपाय

मोदींनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली. ते म्हणाले की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी.

petrol and diesel prices
मी तुरुंगात 19 दिवस फक्त पाण्यावर काढले! सदावर्तेंचा खळबळजनक दावा

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. मागील 21 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com