कलम 370 हटल्यानंतर पहिल्याच काश्मीर दौऱ्यात शहांनी केली मोठी घोषणा

तीन दिवसांच्या दौऱ्यात शहा यांच्याकडून विविध विकासकामांच्या उद्घाटनाबरोबरच सुरक्षा व राजकीय स्थितीचा आढावाही घेतला जाणार आहे.
Amit Shah
Amit Shah

श्रीनगर : जम्मू व काश्मीर (Jammu and Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) शनिवारी पहिल्यांदाच राज्यात दाखल झाले. तीन दिवसांच्या दौऱ्यात शहा यांच्याकडून विविध विकासकामांच्या उद्घाटनाबरोबरच सुरक्षा व राजकीय स्थितीचा आढावाही घेतला जाणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी लगेचच राज्याचा रोडमॅप सांगत मोठी घोषणा केली.

शहा म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये परिसमीन होईल, निवडणूकही होईल आणि पुन्हा राज्याचा दर्जाही मिळेल, असं शहा यांनी स्पष्ट केलं आहे. कलम 370 रद्द करणे अपरिवर्तनीय आहे. काश्मीरमधील युवकांवर दहशतीचे सावट होते. आता हे युवक बदलाची भाषा करत आहेत. खेळ आणि पर्यटनाशी युवकांना जोडले जात आहे. खेळच युवकांना विजय आणि परायय शिकवत असतो.

Amit Shah
शाहरूख खान भाजपमध्ये गेला तर...! भुजबळांनी सांगितलं, काय होईल?

शहा यांनी माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, मागील 70 वर्षांत देशाला काय मिळाले, यावर मी बोलू इच्छित नाही. पण 70 वर्शांत काश्मीरला सहा खासदार आणि तीन कुटुंब मिळाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपर्यंत लोकशाही घराणेशाहीच्या कचाट्यात होती.

370 कलम हटल्यानंतर काश्मीरमध्ये काही महिने कर्फ्यू होता. इंटरनेट अनेक दिवस बंद होते. त्यावर टीकाही झाली. त्यावर मी बोलेन पण मी त्याआधी एक प्रश्न विचारू इच्छितो. 70 वर्षात तीन कुटुंबांचीच सत्ता होती. काश्मीरमध्ये 40 हजार लोक का मारले गेले? याचं तुमच्याजवळ उत्तर आहे का, असा सवाल शहा यांनी केला. 370 हटल्यानंतर त्यांनी लोकांना भडकावण्याचा प्रयत्नही केला होती. काही परदेशी शक्ती यात सहभागी करून घेण्याचे षडयंत्रही रचण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला.

Amit Shah
राजकारणाच्या बदलेल्या गणितांनी भाजप विरोधकांनाही भूमिका बदलायला लावल्या आहेत...

दोन वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद आणि दगडफेकीच्या घटना सतत घडत होत्या. आज विकास, शिक्षण, कौशल्य विकास, युवकांची अखंडता अशा बातम्या येत आहेत. काश्मीरमधील युवकांशी दोस्ची करण्यासाठी काश्मीरचा दौरा करत आहे. मोदीजी आणि केंद्र सरकारशी हात मिळवा आणि काश्मीरला पुढे नेण्याच्या यात्रेत सहभागी व्हा, असं आवाहन शहा यांनी यावेळी काश्मीरमध्ये जनतेला केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com