Badlapur Firing : भाजप आमदार कथोरे घरासमोरील गोळीबारामागे शिवसेनेचा पदाधिकारी; जखमीच्या दाव्यानं खळबळ

Badlapur Firing Shiv Sena Leader Behind Attack on BJP MLA Kisan Kathore House? : अल्ताफ शेख याने पोलिसांना दिलेल्या जबाबात शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश कुडेकर हा या गोळीबाराचा सूत्रधार असल्याचे सांगितले.
BJP MLA Kisan Kathore
BJP MLA Kisan KathoreSarkarnama
Published on
Updated on

Badlapur BJP MLA firing : मुंबईतील बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर दुपारी झालेल्या गोळीबारात जखमी अल्ताफ शेख यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी एका व्हायरल व्हिडिओमार्फत गौप्यस्फोट केला आहे.

या हल्ल्यामागील सूत्रधार म्हणून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपशहरप्रमुख जगदीश कुडेकर यांचे नाव उघड केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हा गोळीबार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षाचा उपशहरप्रमुख जगदीश कुडेकर याच्या सांगण्यावरून केला, असा थेट आरोप गोळीबारात जखमी झालेल्या अल्ताफ शेख याने केला आहे. शिवाय माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचेही त्याने सांगितले आहे.

याआधी जगदीशने माझं दुकान जाळून टाकले होते. यासंदर्भाची तक्रार मी पोलिसांना (Police) केली; मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याचे अल्ताफ याने स्पष्ट केले. अल्ताफ याच्या दावाने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

BJP MLA Kisan Kathore
Top 10 News : उद्याचा मेळावा ठरणार ऐतिहासिक? ठाकरे बंधुंची राजकीय युती होणार का? काय असतील शक्यता? ते काँग्रेसला धक्का, फडणवीसांना दिलासा! पराभूत उमेदवारांच्या याचिका कोर्टानं फेटाळल्या

अल्ताफने पोलिसांना दिलेल्या जबाबात शिवसेना उपशहरप्रमुख जगदीश कुडेकर हा या गोळीबाराचा सूत्रधार असल्याचे सांगितले; मात्र पोलिसांनी एफआयआरमध्ये जगदीशचे नाव घेतले नसल्याचा आरोप अल्ताफ याने केला. जगदीश कुडेकर हा शिवसेना पक्षाचा उप शहरप्रमुख असल्याने राजकीय दबावापोटी पोलिस, असे काम करीत असल्याचा खळबळजनक आरोप अल्ताफने केला आहे.

BJP MLA Kisan Kathore
Jai Gujarat slogan criticism : एकनाथ शिंदेंचा 'जय गुजरात' नारा; जरांगे पाटील म्हणाले, 'मी ऐकलं नाही, नाहीतर खऊट...'

उपशहरप्रमुख जगदीश कुडेकर यांनी याबाबत, मी ही घटना घडली, त्या वेळी माझ्या वैयक्तिक कामासाठी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात होतो, असा दावा केला आहे.

तसंच माझे अल्ताफ शेख याच्यासोबत किरकोळ वाद होते. काल त्याच्यावर जो हल्ला झाला त्यातील एक आरोपी हा माझ्याकडे नोकरीला आहे; पण नोकरीनंतर कोण काय करते, त्याची जबाबदारी माझी नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आहेत. सगळ्या घटनेची चौकशी पोलिस करीत असून, सत्य काय ते समोर येईलच, असेही कुडेकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com