Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंची साथ का सोडली ? ; नितेश राणेंनी सांगितलं कारण..

Maharashtra Politics : राजकारणातून संजय राऊत ही संपलेली व्यक्ती आहे.
 sanjay raut , nitesh rane
sanjay raut , nitesh rane Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून आज 'राजकारणातील संतपरंपरा'वर भाष्य केले आहे. त्याला भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला. काल (शुक्रवारी) ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेते का प्रवेश केला, याचं कारण नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. नितेश राणेंनी समाजमाध्यमावर व्हिडिओ पोस्ट करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

 sanjay raut , nitesh rane
Maharashtra Politics : आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच..; अजितदादांवरील आरोप खोटे की खरे ?

नाईट लाईफचे संत कोण..

"उद्धव ठाकरेंच्या अवती भवती संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासारखे लोक आहेत, म्हणून नीलम गोऱ्हे यांच्यासारखे निष्ठावंत सोडून जात आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. 'सामना'चा आजचा अग्रलेख संत परंपरेवर लिहिला आहे. पण नाईट लाईफचे संत नेमके कोण आहेत ?, अशा शब्दात राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातून संजय राऊत ही संपलेली व्यक्ती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात राऊतांनी काड्या लावल्या. आता ते शरद पवारांच्या घरात काड्या लावण्याचे काम करीत आहेत," असे राणे म्हणाले.

 sanjay raut , nitesh rane
Cabinet expansion : शिंदे-फडणवीसांमध्ये मध्यरात्री 'वर्षा' वर दोन तास खलबतं ; मंत्रीमंडळ विस्ताराबाबत..

काय म्हटलं आहे 'सामना' मध्ये..

'सामना'मधून अजित पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य करण्यात आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे सध्याच्या राजकारणातील ‘संत’ आहेत. तर भुजबळ, हसन मुश्रीफ, वळसे पाटील हे ‘महात्मे’ बनले आहेत. याविषयी सामान्य जनांच्या मनात आता कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची हमी पंतप्रधान मोदी यांनी दिली व त्या हमीनुसार मुश्रीफ वगैरे महात्मे तुरुंगातच जाणार होते, पण आता न्यायालयाने त्यांना जामिनावर बाहेर ठेवले व इतरांच्या फाईलींना ‘चाप’ लावला. भ्रष्टाचार करा व भाजपात सामील व्हा, कायदा तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही, अशा अशा शब्दांत "सामना'मधून भाजपवर कागदी बाण सोडण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com