Sanjay Kelkar : ठाण्यात चाललंय तरी काय? मुख्यमंत्र्यांच्या खात्यातील 100 कर्मचारी करतात 400 कर्मचाऱ्यांचे काम

State Transport : एसटीच्या कळवा विभागातील कर्मचाऱ्यांनी मांडला भाजप आमदार केळकरांकडे समस्यांचा पाढा, भरती न झाल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा चौपट ताण
Sanjay Kelkar, Eknath Shinde
Sanjay Kelkar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane News :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उत्तरदायी मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. असे असतानाच त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या कळवा एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी अक्षरशः तक्रारींचा पाढाच वाचला आहे. तसेच सध्या 400 कर्मचाऱ्यांचे काम 100 कर्मचाऱ्यांना करावे लागत असल्याची धक्कादायक बाबही त्यांनी मांडलीय. या कर्मचाऱ्यांनी भाजप आमदार संजय केळकर यांना निवेदन देत तक्रारींना वाचा फोडली आहे. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी आमदार संजय केळकर यांना साकडेही घालण्यात आले आहे.

Sanjay Kelkar, Eknath Shinde
Thane Municipal Corporation : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ऐकावं ते नवलच; महापालिका मुख्यालयातून 'ती' महत्त्वाची नोंदवही गायब

भाजप आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाईल आणि कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

कळवा येथील विभागीय कार्यशाळेचे बांधकाम २० वर्षे जुने झाले आहे. यापूर्वी या ठिकाणी 400 च्या आसपास कर्मचारी कार्यरत होते. परंतु 2017 नंतर नवीन कर्मचाऱ्यांची भरतीच न झाल्याने 400 कर्मचाऱ्यांच्या कामाचा गाडा 100 कर्मचाऱ्यांना हाकावा लागत आहे. या ठिकाणी आरटीओ पासिंगच्या गाड्यांची कामे तसेच 8 डेपोंच्या गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीची कामे, बॉडीची कामे, पेंटिंगची कामे, तसेच इंजिन गिअरबॉक्स, क्लचप्लेट, क्रशर प्लेट, पिनीअप, जॉइंटस रेडीएटर, पाटे, वेल्डिंग, अपोहस्टर खाते, इलेक्ट्रीशिअनची कामे, फ्रंट अ‍ॅक्सल अशी सर्व रिपेअरिंगचे जवळपास 700 गाड्यांची कामे केली जातात. (Latest Marathi News)

ही कामे करत असताना कर्मचाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. आरटीओ पासिंग गाड्यांच्या 3 दिवसांचे काम एका दिवसामध्ये सक्तीने करून घेतले जाते. नाही केल्यास प्रशासकीय दबाव टाकला जातो. म्हणजेच बदली करून चार्जशिट घेऊन पंचिंग कार्ड जमा करून अर्ध्या दिवसाचा पगार कापू, अशा धमक्या दिल्या जातात.

हेवी वर्क असल्याने 50 टक्के कर्मचारी हे शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत, तर काही कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. संपूर्ण वर्कशॉपचे बांधकाम पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे 90 ते 100 कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. टॉयलेट, बाथरूम अस्वच्छ असतात त्यांची अवस्थाही बिकट आहे. तसेच वर्कशॉपच्या आवारात साफसफाई केली जात नाही, अपघात झाल्यास प्रथमोपचार पेटी आणि अॅम्ब्युलन्सची सुविधा नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामे म्हणजेच मासिक वेतन वाढ ही 6 महिने ते 1 वर्ष उशिराने मिळते. तसेच मेडिकल बिलांचे क्लेम आणि टी. ए. बिल वेळेत मिळत नाही. कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांबद्दल माहिती लवकर मिळत नाही, कर्मचाऱ्यांसाठी कँटिनची व्यवस्था नाही, पाण्याच्या टाक्या वेळेवर साफ होत नसल्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या या तक्रारींवर आमदार संजय केळकर कसा तोडगा काढणार, याकडे या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Sanjay Kelkar, Eknath Shinde
Anand Dighe : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून आनंद दिघे यांचं अस्तित्व पुसण्याचं कटकारस्थान कुणाचं? केदार दिघे यांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com