Anand Dighe : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून आनंद दिघे यांचं अस्तित्व पुसण्याचं कटकारस्थान कुणाचं? केदार दिघे यांचा सवाल

Kedar Dighe : आनंद दिघे यांच्या प्रवेशद्वाराला विरोध करणारा अदृश्य हात कुणाचा हे ठाणे महापालिकेनं जाहीर करावं, असं आवाहन ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी केलं आहे.
Anand Dighe, Kedar Dighe
Anand Dighe, Kedar DigheSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:ला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवून घेतात. तरीही जवळपास दीड वर्ष झालं तरी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार उभारण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे ठाण्यातून दिघेसाहेबांचे अस्तित्व पुसण्याचं काम महापालिकेकडून होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे.

महापालिकेच्या माध्यमातून जरी हे काम होत असलं तरी यामागं कुणाचं अदृश्य हात आहेत आणि कुणाचं हित साधलं जातंय? असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Anand Dighe, Kedar Dighe
Thane Politics : 'ठाणेदार'बाबत संभ्रम; सरनाईक यांच्या वक्तव्याने रवींद्र फाटकांचे लोकसभेचे फाटक बंद?

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नावानं असलेलं प्रवेशद्वार वर्षभरापूर्वी महापालिकेनं काढलं. त्यानंतर वर्ष उलटूनही त्या ठिकाणी नव्यानं प्रवेशद्वार उभारण्याचं काम ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) करत नसल्यानं यामागं नेमका उद्देश काय असावा, असा सवाल केदार दिघे यांनी विचारला आहे. दिघे यांचं अस्तित्व ठाण्यातून पुसण्याचं काम कुणी करत आहे का, याचं उत्तर आता ठाणे महापालिकेनं द्यावे, असं आवाहनच केदार दिघे यांनी केलं आहे.

महापालिका प्रशासन ठाण्यात दिखाव्यासाठी वरवर रंगरंगोटी करत आहे, दीपस्तंभ उभे करत आहेत, मग आनंद दिघे यांच्या प्रवेशद्वाराचं (Dharmaveer Anand Dighe Praveshdwar) वावडं का, हे स्पष्ट करावं. खरंतर महापालिका प्रशासनानं तातडीनं दिघे यांच्या नावानं असणारं प्रवेशद्वार उभारायला हवं होतं. पण, या कामात होणारी दिरंगाई चिंताजनक आहे, असंही दिघे यांनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य मानतात. त्यांच्या नावाचा गजर ते कायम करत असतात. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात (Thane) आणि आनंद दिघे यांच्या कर्मभूमीतच त्यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराला होणारी दिरंगाई चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे आतातरी धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वाराच्या कामाला गती मिळणार, याची उत्सुकता ठाणेकरांना लागली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Anand Dighe, Kedar Dighe
Lok Adalat and Thane News : मुख्यमंत्र्यांचं ठाणे 'तडजोडीत' अव्वल; सलग सहाव्यांदा महाराष्ट्रात पहिला क्रमांक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com