Gujarati language in Mumbai : गुजरात भाजप आमदारानं मुंबईत येत 'मनसे'ला डिवचलं; संपर्क कार्यालयाच्या 'गुजराती भाषे'वर ठाम

BJP MLA Virendrasinh Jadeja Faces MNS Protest for Gujarati Office Board in Seawoods : मुंबई सीवूड्स सेक्टरमध्ये गुजरातमधील भाजप आमदार विरेंद्रसिंग जाडेजा यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे.
BJP MLA Virendrasinh Jadeja
BJP MLA Virendrasinh Jadeja Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai language row news : मराठी-हिंदीवरून राज्यात चांगलाच वाद पेटलेला आहे. मुंबईत भाषा वादाचं केंद्र बनलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी आग्रह आहे. राज ठाकरे यांची मनसे मराठीच्या मुद्यावर चांगलीच आक्रमक आहे. मिरा-भाईंदरमध्ये मराठी लोकांचा मोर्चा आणि त्यानंतर राज ठाकरेंची झालेली सभा चर्चेस्थानी राहिली.

मुंबईत मराठी भाषेसाठी आग्रह असताना, गुजरातमधील भाजप आमदार विरेंद्रसिंग जाडेजा यांनी 'मनसे'ला डिवचलं आहे. मुंबईतील सीवूड्स सेक्टरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केलं असून, संपर्क कार्यालयावरील फलक गुजराती भाषेत लावण्यात आल्याने 'मनसे' आक्रमक झाली आहे. आमदार जाडेजा यांनी या फलकावरील भाषा मराठी करून पुन्हा 'गुजराती' केल्याने आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्याने वाद उफळला आहे.

सीवूड्स सेक्टर-42 मधील शेल्टर आर्केड इमारतीत गुजरातमधील भाजपचे (BJP) आमदार विरेंद्रसिंग जाडेजा यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयावर फलक लावताना सुरवातीला संपूर्ण गुजराती भाषेचा वापर करण्यात आला होता. परंतु स्थानिक मनसे कार्यकर्त्यांकडे याबाबत तक्रारी झाल्या.

मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी सुरवातीला विनंती करत, भाषा मराठी करण्याची विनंती केली. यानंतर फलकावरील भाषा बदलून मराठी करण्यात आली. परंतु दोन दिवसानंतर पुन्हा फलकावरील मराठी भाषा बदलून गुजराती करण्यात आली आहे. यावरून आता वाद उफळला आहे.

BJP MLA Virendrasinh Jadeja
Manikrao Kokate rummy video : अजितदादांच्या शिलेदारांची बात कुछ हजम नहीं हुई; कोकाटे म्हणताय 'जाहिरात स्कीप' करत होतो, तर जगतापांनी 'AI'वर ढकललं...

या फलकावरील बदलेल्या भाषेत मराठीला दुय्यम स्थान देण्यात आलं आहे. अतिशय कमी शब्दात आणि दिसणार नाही, अशा पद्धतीने मराठी भाषेचा वापर केल्याचा आरोप मनसेचे शहर सचिव सचिन कदम यांनी केला आहे. मराठी भाषेचा अनादर केल्याप्रकरणी भाजप आमदार विरेंद्रसिंग जाडेजा रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.

BJP MLA Virendrasinh Jadeja
NCP News : कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी; सुनील तटकरेंसमोर छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते भिरकावले! लातूरमध्ये राडा..

सचिन कदम म्हणाले, "सुरवातीला संपर्क कार्यालयावरील फलक गुजराती भाषेमध्ये होता. याबाबत संबंधितांना तक्रार केल्यानंतर 18 जुलैला फलकावरील भाषा मराठी करण्यात आली. परंतु 20 जुलैला पुन्हा फलकावरील भाषा गुजराती करण्यात आली. फलकावर लहान साइज एका ठिकाणी मराठी भाषेचा वापर केला आहे. यातून याची मगरूरी दिसते". मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा डाव आहे, असा गंभीर आरोप सचिन कदम यांनी केला.

'छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही मावळे आहोत. पण त्यांनी आम्हाला गनिमी काव्यानं लढायचं शिकवलं आहे. मनसे इथं येऊन तोडफोड करावी. म्हणजे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतील. स्थानिक पोलिस ठाण्यात याबाबत संबंधित आमदाराविरोधात मराठी भाषेचा तिरस्कार केला म्हणून, रीतसर तक्रार करून गुन्हे दाखल करणार आहोत', असेही सचिन कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com