Girish Bapat : काही दिवसापासून राज्यातील राजकारणाचा स्तर ढासळत चालला आहे. खालच्या पातळीवर टीका करणे, शिवीगाळ करणं हे काही राजकीय नेत्यांचे नित्याचेच झाले आहे, शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना, तर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांना नुकतीच शिवीगाळ केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण कुठे चाललं आहे, असा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे. ( Girish Bapat latest news)
अशातच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी समाज माध्यमांतून सुसंस्कृत पुण्यातील राजकारणाचा स्तर ढासळत चालत असल्याची खंत व्यक्त केली आहे. खासदार बापटांनी काँग्रेस शहराध्यक्षांच्या पत्राची दखल घेत सडेतोडपणे आपले मत मांडले आहेत.
"याचा विचार सर्वच पक्षांनी आणि त्यांच्या नेतृत्वाने केला पाहिजे," अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी स्वः पक्षातील नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाच्या नेत्यांना फेसबूकच्या माध्यमातून खडेबोल सुनावले आहेत.गिरीश बापट यांनी फेसबूक व्यक्त केलेले मतांचा चर्चा आहे, बापटांना मनात नेमकं चाललयं का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून बापटांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारीवरून स्वपक्षावर टीका, नदीसुधार योजनेच्या संथ गतीने होत असलेल्या कामांबाबत महापौरांवर नाराजी, संकल्पना फलक आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी उभारलेल्या वास्तूंना कुटुंबियांची नावे देण्यावरून नगरसेवकांचे जाहीर कार्यक्रमात टोचलेले कान आणि पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने नगरसेवकांकडून मागितलेले खुलासे, या खासदार गिरीश बापट यांच्या कृतीने कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत.
शेवगाव येथील सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पुण्यातील कॉंग्रेस भवनामध्ये घुसून गोंधळ घातला होता.या प्रकारानंतर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी खासदार बापट यांना पत्र लिहून राजकारणाच्या खालावत चालेल्या दर्जाबाबत नाराजी वक्त केली होती.त्यानंतर बापटांनी यावर सविस्तर भाष्य केलं आहे. खासदार बापटांनी काँग्रेस शहराध्यक्षांच्या या पत्राची दखल घेत सडेतोडपणे आपले मत मांडले आहे.
"राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही असा पुण्यातील सामान्य माणूस सध्या खूप अस्वस्थ आहे. भविष्यात मतदान करू की नको, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. सब घोडे बारा टक्के या नात्याने सगळेच राजकीय पक्ष वागू लागले असल्याने सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचे, राजकीय पक्षांनी पातळी सोडून वर्तन सुरू केले आहे. पुणेही या प्रकाराला अपवाद नाही. पुण्यासारख्या सुसंस्कृत नेतृत्व दिलेल्या शहरात असा प्रकार होऊ लागला तर सर्वच पक्षांनी आणि त्या पक्षाच्या प्रमुख नेतृत्वाने याबाबत पुनर्विचार केला पाहिजे.
देश व महाराष्ट्राला ज्या पुणे शहराने सांस्कृतिक आणि राजकीय नेतृत्व दिले, त्या पुण्यात असे घडत आहे, याबाबत सर्वांनीच पुनर्विचार केला पाहिजे. एखाद्या मुद्द्याला विरोध करणे, तो खोडून काढणे, आपली मते मांडणे, असे जे-जे लोकशाहीच्या चौकटीत बसते, ते करण्यास हरकत नाही. परंतु, गेल्या सहा-सात महिन्यांत बॅनर लावणे, जोडे मारणे, पुतळे जाळणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, अशी आपली संस्कृती नाही. ज्या नागरीकांना राजकारणाशी देणे-घेणे नाही, ती मंडळी सद्यःस्थितीत मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आहेत. मतदान करावे की करू नये, या मनस्थितीपर्यंत काही लोक पोचले आहेत. सगळेच असे वागू लागले, तर सामान्य माणसांनी बघायचे कोणाकडे?, दुसरा कोणी सांगण्यापेक्षा प्रत्येक पक्षाने याचा विचार करून विकास कामांकडे लक्ष दिल्यास अधिक चांगले होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.