Shiv Sena News : 'शिवसेनेचे बंडखोर ठाकरेंकडे परत जातील'; भाजपा खासदाराच्या दाव्याने पुन्हा खळबळ

Subrahmanyam Swamy News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची जोरदार चर्चा राज्यामध्ये पाहायला मिळत आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची जोरदार चर्चा राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. अजित पवार व शरद पवार गटाच्या स्वतंत्र बैठका मुंबईत आयोजित करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादीतील फूट चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही शक्यता भाजपाच्या (BJP) एका खासदाराने वर्तवली आहे!

भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subrahmanyam Swamy) नेहमीच त्यांच्या ट्वीटमधून स्पष्ट भूमिका मांडत असतात. स्वामींनी केलेल्या एका ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या कानावर ही बाब पडल्याचे स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Sharad Pawar News : शरद पवारांच्या बैठकीला कोणते आमदार अन् खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी

स्वामींनी ट्वीटमध्ये राष्ट्रवादी शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येणार असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. '' स्वामी म्हणाले मी मुंबईत आहे. शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोर उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात. कारण मोदींनी आधी त्यांचा वापर करून घेतला. नंतर त्यांना बाजूला सारून आता राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) चुचकारण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीमुळे ते अस्वस्थ झाले आहे, असे मी ऐकले'' सुब्रह्मण्यम स्वामींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Sharad Pawar News : शरद पवारांच्या बैठकीला कोणते आमदार अन् खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, ज्या राष्ट्रवादीवर टीका करत उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. त्याच राष्ट्रवादीला भाजपाने सोबत घेतल्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुब्रह्मण्यम स्वामींचे ट्वीटमुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com