निलंबन रद्द होताच आमदार कुचेंनी मानले न्यायालयाचे आभार

नारायण कुचे यांच्या कार्यालय समोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आघाडी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Narayan Kuche
Narayan Kuchesarkarnama
Published on
Updated on

जालना: भाजपच्या १२ आमदारांचे निंलबन रद्द करण्यात आल्याच्या निर्णयानंतर जालन्यातील बदनापूर भाजपा आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांनी आघाडी सरकारने हे निलंबन सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत सर्वच न्यायालयाचे आभार व्यक्त केले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्या आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. आमदार नारायण कुचे यांचं निलंबन रद्द होताच कुचे समर्थकांनी मोठ्या जल्लोष साजरा केला. या निर्णयाचे उठवत स्वागत केले आहे. भाजपा आमदार नारायण कुचे समर्थकांनी आमदार नारायण कुचे यांच्या कार्यालय समोर फटाक्यांची आतिषबाजी करत निलंबन करणाऱ्या आघाडी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष साजरा केला.

Narayan Kuche
मुख्यमंत्री ठाकरेंचा मेहुणा सोमय्यांच्या रडारवर, म्हणाले..

विधानसभेत पावसाळी अधिवेशानावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज घेतला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झटत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी यावर भाष्य केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

Narayan Kuche
आमदाराला अश्रू अनावर! ७० हजारांचे कमळ, नोकरीचा राजीनामा, तरीही तिकीट कापलं!

''न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बारा आमदारांची फाईल दाबून ठेवली, हा राज्य घटनेचा भंग नाही का, ज्या बारा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातला, विधानसभेत गोंधळ घातला, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली, अशा लोकांवर जी सर्वोच्च न्यायालयानं सहानुभूती दाखवली आहे, मग ती सहानभूती अधिकार आमच्या बारा आमदारांना का नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Narayan Kuche
न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे ? आमच्या बारा आमदारांना का नाही!

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavisयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. टि्वट करीत त्यांनी आभार मानले आहे. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी 'सत्यमेव जयते,' असं म्हटलं आहे. आपल्या टि्वटमध्ये फडणवीस म्हणतात, ''राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार! या निकालाचे आम्ही स्वागत करतो,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com