Pappu Kalani : उल्हासनगरवर चार दशकं दबदबा राखणारे पप्पू कलानी नेमके कोणत्या पक्षात ?

Ulhasnagar Politics : गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या कलानींना का आहे इतके महत्व ?
Pappu Kalani
Pappu KalaniSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : उल्हासनगरच्या राजकारणात चार दशकांहून स्वतःचा दबदबा निर्माण करणारे आणि सर्वच राजकीय पक्षांना हवेसे असणारे कुख्यात गुंड आणि टाडाफेम पप्पू कलानी नेमके कोणत्या पक्षात आहेत, याची चर्चा सध्या रंगली आहे. इतकेच नव्हे तर अनेक नेते त्यांच्या घराचे उंबरठे झिजवत असल्याचे दिसून येते.

पप्पू कलानी यांचे काका सुरुवातीला राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पप्पू कलानी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते बनले. याच पक्षातून त्यांनी उल्हासनगर पालिकेत अध्यक्ष पद आणि आमदारकी भूषविले. मात्र त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमूळे त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. मात्र हाती काही लागत नाही, हे पाहून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची वाट चोखाळली. आरपीआयमधून त्यांनी 2004 मध्ये आमदारकी लढवली आणि निवडूनही आले. काही कालांतराने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षाशी हातमिळवणी केली.

Pappu Kalani
BJP Leaders : ऐकावं ते नवलंच! दिल्लीच्या मंत्र्यांना चक्क पुण्याची हवा सोसेना...

वडिलांसाठी कलानीपुत्र भाजपात

पप्पू कलानी (Pappu Kalani) यांच्यावर खुनाच्या प्रकरणी टाडा लावण्यात आला आहे. २०१३ मध्ये इंदर भटीजा यांच्या खून खटल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला होता. या गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा मुलगा ओमी कलानींनी भाजपची वाट धरली.

त्यानंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र त्यानंतरही यावेळी ओमी कलानी यांनी पप्पू कलानी हे कायमचे बाहेर आल्याचा मोठा गौप्य स्फोट केला होता. अजूनही पप्पू कलानी बाहेर असून राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते.

Pappu Kalani
Sharad Pawar : हर्षवर्धन पाटलांशी चर्चा; शरद पवारांच्या डोक्यात काय सुरू ?

पप्पु कलानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. याचदरम्यान राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) वेगळे होऊन सत्तेत सामील झाले. त्यानंतर ओमी आणि पप्पू कलानी नेमके कोणाच्या गटात आहेत, हे समजणे अवघड झाले. त्यातच रोहित पवारांनी उल्हासनगरमध्ये जाऊन पप्पू कलानींची भेट घेतली. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कल्याणमधील कार्यकर्ता मेळाव्यात पप्पू यांना भेटतील असे वाटत होते. मात्र त्यांनी ही भेट टाळली. त्याच दिवशी रात्री एका कार्यक्रमाला जाताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांची गाडीत भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, पप्पू कलानींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी त्यांनी उल्हासनगर येथे अनेक चांगली कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यातील झालेल्या राजकीय नाट्यानंतरही उल्हासनगरचे डॉन समजले जाणारे पप्पू कलानी आणि ओमी कलानी नेमके कोणत्या पक्षात आहेत, याबाबत आजही राजकीय वर्तुळात संभ्रम असल्याचे दिसून येते.

(Edited By Sunil Dhumal)

Pappu Kalani
Sharad Pawar On Ram Temple : पवारांचा थेट मुद्द्यालाच हात; 'मंदिर वहीं बनाएंगे' म्हणणाऱ्या भाजपला दाखवली 'जागा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com