Baramati Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत मवाळ भूमिका घेणारे आमदार रोहित पवार आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. बारामती दौऱ्यावर असताना रोहित पवारांनी अजितदादांवर टीकेची झोड उठवली. तसेच बारामती अजित पवार गटाने कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही लढण्यास सज्ज असल्याचे आव्हानच रोहित पवारांनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात बारामतीच्या राजकारणाला नवे वळण लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
रोहित पवारांनी गुरुवारी (Baramati) बारामतीतूनच अजित पवारांच्या भूमिकांचा समाचार घेतला. यावेळी बारामती लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळेंचाच विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे.
याबाबत रोहित पवारांना विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, अशा चर्चा अजित पवार मित्रमंडळाकडून चर्चा केली जात असल्याचे वाटते. अशा गोष्टी पेरण्यात आल्या आहेत. मात्र तसा काही निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला, तर आम्ही लोकांची ताकद आणि विश्वासावर त्यांच्याविरोधात लढा देऊ, असे रोहित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, 'भविष्यात ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, त्या जागा महाविकास आघाडीशी चर्चा करून आम्ही लढवणार आहोत. आम्ही इतरांप्रमाणे दुसऱ्या पक्षाचा आदेश घेत नाही. लोकशाही मार्गाने चर्चा करून आम्ही ज्या ठिकाणी सक्षम आहोत, अशा जागा आम्ही घेणार आहोत. आम्हाला कोणीही जागा देणार नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनता जागा दाखवेल,' असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लागावला.
बारामती कुणी घडवली ?
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामती कोणी उभी केली, हे अंतर्मनाला विचारा, असा सवाल केला होता. त्यावर रोहित म्हणाले, 'स्वतःच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून त्या जिंकण्याची कसब शरद पवारांकडे आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीचे चिन्ह लोकांना नीट माहितीही नव्हते. मात्र साहेबांवर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केले आणि सत्ता दिली. त्यावेळी अनेक युवा नेतृत्वांना त्यांनी मंत्री केले. त्यातून बारामती आणि इतर भागाचा विकास झाला. साहेबांनी ताकद दिली नसती, व्हिजन दिले नसते अथवा त्यांना निवडूनच आणले नसते, तर अजितदादांना काहीच करता आले नसते. त्यामुळे बारामती उभारण्यात फक्त आपलाच यामध्ये वाटा आहे, असे कुणीही म्हणू नये.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ते एकच बाजू सांगतात...
बारामतीत (Ajit Pawar) अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी रोहित पवारांनी एकही संधी सोडली नाही. अजित पवारांची स्टाईल आता लोकांना आवडत नसल्याचे कारणही त्यांनी यावेळी दिले. रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांची पूर्वी जी स्टाईल होती, ती आपल्या सर्वांना आवडत होती. ते स्टेट फॉरवर्ड नेते होते. त्यांचा तो अॅटिट्यूड अलिकडे दिसत नाही. अजितदादा आता पक्षाचे जे काही नुकसान झाले ते शरद पवारांमुळे झाले असे वारंवार सांगतात. मात्र शरद पवारांमुळे जो काही फायदा झाला, ते सांगताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून माणसे दुरावत चालली आहेत. याचा परिणाम त्यांना आगामी निवडणुकांमध्ये दिसेल,' याकडेही रोहित पवारांनी लक्ष वेधले.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.