Pravin Darekar News : सध्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करेल, असं व्यापक नेतृत्व इतर कोणत्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे लोकसभेच्या या निवडणुकीत भाजप सहयोगी पक्षांच्या साथीने ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणतील, असा विश्वास भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रवीण दरेकर यांच्याशी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विविध विषयांवर संवाद साधला. दरेकर म्हणाले, भाजप पक्षासमोर सध्या इतर पक्षाचा मोठा नेता कोणीही नाही.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत त्यांची बरोबरी करेल, असं व्यापक नेतृत्व कुठल्याच पक्षाकडे नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला शंभर टक्के कळेल की ४५ पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्ष (BJP) आणि आमच्या सहयोगी पक्षाच्या निवडून आलेल्या असतील.
नाशिकच्या जागेविषयी भाष्य करताना दरेकर म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार कुठे असावा कुठली जागा असावी, याविषयी व्यक्तिगत भूमिका त्या पक्षाचा पदाधिकारी, नेता म्हणून मांडतात. पण, महायुतीचा एकत्रितपणे निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजितदादा पवार (Ajit Pawar) हे यासंदर्भातील नाव दिल्लीला पाठवतील.
दिल्लीचे भाजपचे संसदीय मंडळ यावर शिक्कामोर्तब करेल. त्यामुळे कोणी काहीही घोषणा केल्या तरी त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांना बोलत असतात. पण, युतीतील तिन्ही पक्षांत योग्य समन्वय साधून कुठल्याही प्रकारची विसंगती आमच्यात होणार नाही. एकोप्यानं निर्णय घेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) बनवण्यासाठी आम्ही सारे ताकतीने लढू आणि जिंकू.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काही खासदारांना डच्चू मिळेल...
काही विद्यमान खासदारांना डच्चू मिळेल काय, या प्रश्नावर दरेकर म्हणाले, मला वाटते की या जर तरच्या गोष्टी आहेत. भाजप उमेदवारी देताना त्या ठिकाणी एक प्रक्रिया करून उमेदवारी दिली जाते. उमेदवारी देताना तेथील जनतेला काय हवं आहे, कार्यकर्त्यांना काय वाटते यावर भूमिका घेऊन निर्णय होत असतात, मग बदल केल्यावर कोणाला धक्का वाटतो, कोणाला बरं वाटतं, असे त्यांनी नमूद केलं.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.