Praveen Darekar News : 'संजय राऊतांना किंमत देऊ नका', प्रवीण दरेकर भडकले

Sanjay Raut : राऊत यांना कायदा, नियम कशाचेच ज्ञान नाही. कितीही बोलले तरी...
Praveen Darekar
Praveen Darekarsarkarnama

Mumbai : संजय राऊत यांनी आरोपी सलीम कुत्ता याला जामीन देण्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नैतिकतेचा कुठलाही आधार नसणारे राऊत बेताल बोलतात, त्याला फार किंमत देऊ नये, असा टोला लगावला. संजय राऊत यांचे पाय शेवटी चिखलातच रुततील, असा इशारा देखील दरेकर यांनी दिला आहे. 

पॅरोलवरील कैद्याच्या सुटकेचे आदेश न्यायालय देते, गृहमंत्री देत नाहीत. राऊत यांना कायदा, नियम कशाचेच ज्ञान नाही. कितीही बोलले तरी संजय राऊत यांचे पाय चिखलातच रुतणार आहेत. सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकरसोबत राऊत यांचा फोटो आहे, तो त्यांनी दाखवावा, असे दरेकर म्हणाले.

Praveen Darekar
Maharashtra BJP News : मोदींची गॅरंटी देशाला विकासाकडे नेणार...

बॅलेटवर मतदान घ्या, संजय राऊत यांच्या विधानावर दरेकर यांनी ते सोयीचे राजकारण करतात असे म्हणत मागच्यावेळी तीन-चार राज्यांत काँग्रेसचा विजय झाला आणि भाजपाचा पराभव झाला. तेव्हादेखील ईव्हीएम मशीनवरच मतदान झाले होते. तेलंगणात काँग्रेस विजयी झाली, तो विजय बोगस आहे का ? असा सवाल राऊत यांना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर आमदारकी जाणारच!

सुनील केदार यांची आमदारी रद्द केल्याने नाना पटोले यांनी टीका केली होती. त्यावर सुनील केदार यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला भाजपा जबाबदार नाही. त्यांनी केलेल्या चुका, भ्रष्टाचार या आधारे न्यायालयाने निकाल दिला आहे. शिक्षा झाल्यावर आमदारकी जातेच, संविधानाच्या चौकटीतच कारवाई होते, असे दरेकर म्हणाले.

(Edited By Roshan More)

Praveen Darekar
MP Sadashiv Lokhande : खुर्ची नको म्हणत खासदार सदाशिव लोखंडे खालीच बसले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com