मुख्यमंत्री रात्री विधानभवनात..CCTV बंद, काय सिक्रेट?

भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राणे यांनी टि्वट करुन मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमागे काय सिक्रेट आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Nitesh Rane,uddhav thackery

Nitesh Rane,uddhav thackery

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री विधानभवनाला अचानक भेट दिली. त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पाहणी केली. यावरुन भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. राणे यांनी टि्वट करुन मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमागे काय सिक्रेट आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आपल्या टि्वटमध्ये नितेश राणे म्हणतात, ''मुख्यमंत्री काल विधान भवनात आले. चालून पाहिलं ही चांगली गोष्ट आहे. पण मुख्यमंत्री आले तर CCTV का बंद होते, सिक्युरिटीला का जायला सांगितलं होत? काय सिक्रेट आहे,''

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर सर्व्हाइकल स्पाईन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. पण काल रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री अनिल परब यांच्यासह अचानक विधान भवनात पोहोचले होते. त्यांनी अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा सरावही केला.

तब्येतीच्या कारणामुळे गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) हे विश्रांती घेत होते, पण शुक्रवारी रात्री अचानक ते विधानभवनात आले. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पाहणी केली. विधान भवनातील (vidhan bhavan) विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी तिथल्या पूर्व तयारीची पाहणी केली. अशी माहिती सूत्रांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane,uddhav thackery</p></div>
उद्धव ठाकरे रात्रीच पोहोचले विधानभवनात!

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly session) पुढच्या आठवड्यात मंगळवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशानचे जेवढे टेन्शन आता सरकारमधील मंत्र्यांना आले आहे. कारण या काळात विविध विभागाच्या सचिवांची विधानभवन प्रांगणात उपस्थिती सक्तीची केली आहे. ऐनवेळी सरकारला आवश्यक वाटणारी माहिती पुरवण्यास कुचराई किंवा दिरंगाई झाल्यास संबंधित विभागाचे सचिव कारणीभूत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेशही मुख्य सचिवांच्या कार्यालयाने काढला आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांना टेन्शन आलयं. अधिवेशन काळात सर्व अधिकाऱ्यांना रजा घेण्यासाठी अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, मंत्री कार्यालय अथवा मुख्य सचिव यांच्या परवानगीनेच रजा घेता येणार आहे. अन्यथा उपस्थिती सक्तीची आहे.

अधिवेशनाच्या कामकाजात सत्ताधारी पक्षातील, विरोधी बाकावरील दोन्ही सदनातील आमदार जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतात. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पीठासीन अधिकारी काही वेळेस ताबडतोब निर्देश देत असतात. तसेच लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करून त्याबद्दल कोणती कार्यवाही केली यावर प्रश्न विचारत असतात. त्यावेळी ताबडतोब माहिती सदनाच्या पटलावर अथवा संबंधित खात्याचे मंत्री, राज्यमंत्री यांना उपलब्ध करून द्यावी लागते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com