Eknath Shinde VS BJP
Eknath Shinde VS BJP sarkarnama

BJP Politics Video : भाजपने एकनाथ शिंदेंना खरे रंग दाखवले, फक्त 50 जागांवर बोळवण? 'त्या' ऑफरने गणित फिस्कटणार!

BJP Vs Eknath Shinde Shiv Sena BMC Elections : भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मुंबी महापालिकेत जागावाटपाची बोलणी सुरू आहे. मात्र, भाजपने दिलेल्या प्रस्तावाने ही बोलणी फिस्कटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on

BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत युती होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजप शिंदेंना बरोबर घेण्यास तयार आहे. मात्र, 227 जागांच्या मुंबई महापालिकेत केवळ 50 जागाच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला देऊ केल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने एकनाथ शिंदेंना केवळ 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे.

भाजपने वाॅर्ड निहाय उमेदवारांची यादी तयार केली असून शिवसेनेतील फूटीनंतर एकनाथ शिंदेंकडे केवळ 47 माजी नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिंदेंची ताकद केवळ 50 ते 52 वाॅर्डपुरतीच असल्याचा दावा भाजप नेते खासगीत करत आहेत. त्यामुळे शिंदेंना केवळ 52 जागांचा प्रस्ताव भाजपकडून देण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिकेत 50-50 टक्के जागेंचा प्रस्ताव भाजपला दिल्याची माहिती आहे. शिंदेंची शिवसेना 125 जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे. मराठी मतांची टक्केवारी लक्षात घेता भाजपने आम्हाला 50 टक्के जागा दिल्या पाहिजे, यासाठी शिंदेंच्या शिवसेनेतील नेते आग्रही आहेत.

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष

युतीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. जर, शिवसेना कमी जागांवर लढली तर महाराष्ट्रभर चुकीचा संदेश जाईल, अशी भीती शिंदेंच्या शिवसेनेतील नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे 50 जागांचा प्रस्ताव एकनाथ शिंदे स्वीकारणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत जागा वाटपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत शिंदे काय निर्णय घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंच्या युतीची घोषणा शिवतीर्थावर

या आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमधील युतीची घोषणा होईल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवतीर्थावर भव्य सभा घेत ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com