BJP Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजप नेत्यांचं चाललंय तरी काय?

Crime Case : भाजपच्या माजी नगरसेवकाविरोधात बलात्कार-फसवणुकीचा गुन्हा, तर आमदारांविरोधात महिलांचा व्हिडीओ व्हायरल
MLA Ganpat Gaikwad, Manoj Roy
MLA Ganpat Gaikwad, Manoj RoySarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli Political News :

कल्याण आणि डोंबिवली ही सुसंस्कृत शहरे म्हणून ओळखले जातात. कल्याण पूर्वेला भाजपचे आमदार आहेत तर कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे अनेक नगरसेवक आहेत. पण त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे पक्ष म्हणून भाजपचे नाव बदनाम होत असल्याची टीका होत आहे.

दोन दिवसांपूर्वी भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याविरोधात गंभीर आरोप करणारा महिलांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे तर आता भाजपचे माजी नगरसेवक मनोज रॉय यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत.

MLA Ganpat Gaikwad, Manoj Roy
BJP News : भाजप आमदाराकडून ग्रामस्थांची फसवणूक? काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य

40 वर्षीय महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भाजपचे माजी नगरसेवक मनोज रॉय यांच्यावर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर चारवेळा गर्भपात करण्यात आला, असा आरोप या महिलेने केला आहे. मनोज रॉयने जबरदस्तीने गर्भापात केले, मारहाण केली, शिवीगाळ केली शिवाय धमकीही दिली, असे आरोपही या महिलेने केले आहेत.

विशेष म्हणजे मनोज रॉय यांच्यावर यापूर्वी जमिनीवरून झालेल्या एका वादाबाबत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. रॉय यांच्यावर जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा, त्याच्यावर वार केल्याचा आरोप आहे.

रॉय हे बांधकाम व्यवसायात आहेत. असे असले तरी तक्रारदार महिलेने रॉय यांचा पूर्ण पत्ता न दिल्याने त्यांना शोधणे कठीण असल्याचे कोळसेवाडी पोलिस सांगतात. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ करत आहेत. यासंदर्भात रॉय यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गायकवाडांवर आरोप

दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील (Kalyan) भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर स्थानिक महिलांना आरोप केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी गुजराती विकासकाला जमीन विकली आणि त्याचे पैसे स्थानिकांना दिले नाहीत, असा आरोप या व्हिडिओतून करण्यात आला आहे.

आमच्याकडे बँकेचे प्रूफ आहेत, एक रुपयाही आम्हाला मिळाला नाही आणि 2 कोटी रुपये दिल्याची गोष्ट करता, असे या महिलांनी आमदार गायकवाड यांना खडसावले आहे. तुम्हाला गाववाला म्हणून गरिबाच्या बाजूने घेतला होता. मात्र गाववाल्यानेच गरिबांची फसवणूक केली, असा आरोप या महिलांना केला आहे.

यावर या महिला खोटे बोलत आहेत, असे सांगत आमदार गायकवाड यांनी त्यांच्यावरील आरोप खोडले होते.

(Edited by Avinash Chandane)

MLA Ganpat Gaikwad, Manoj Roy
Sanjay Raut : ठाकरे गटाचा कल्याणवर डोळा? श्रीकांत शिंदेंना 'असा' देणार शह

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com