BJP News : भाजप आमदाराकडून ग्रामस्थांची फसवणूक? काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य

BJP MLA Ganapat Gaikwad : जमिनी हडपल्याचा गावकरी महिलांचा गंभीर आरोप, आमदाराकडून आरोपांचा इन्कार
MLA Ganapat Gaikawad
MLA Ganapat GaikawadSarkarnama
Published on
Updated on

Dombivli Political News :

भाजप सगळे व्यवसाय गुजरातला नेतात आणि मुंबईतील सगळ्या जमिनी गुजराती-मारवाडी विकासकांच्या घशात घातल्या जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षाकडून नेहमीच होतो. आज कल्याण पूर्वेतील काही महिलांनी देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर असाच गंभीर आरोप केला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गुजराती विकासकाला जमीन विकली असून आम्हाला पैसे दिले नाहीत, असा आरोप एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओनंतर आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. या महिला खोटे बोलत आहेत, असा दावा भाजप (BJP) आमदार गायकवाड यांनी केला आहे.

MLA Ganapat Gaikawad
Shivsena VS BJP : सत्ताधारी भाजप-शिवसेनेत शाखेवरून जुंपली; कोण काय म्हणतंय ?

या व्हिडिओत दडलंय काय?

आमदार साहेब सगळ्यांसाठी असतात फक्त तुमच्यासाठी नसतात, असे बोलत या महिलांनी आमदारांच्या आजूबाजूला असणाऱ्या विकासकांच्या सिक्युरिटीला गप्प केले. तुम्ही साहेब आहात. तुमच्याकडे लिखापडी आहे. पण बँकेचे प्रूफ तुम्हाला आम्ही देतो.

एक रुपया आम्हाला मिळाला नाही आणि 2 कोटी रुपये दिल्याची गोष्ट करता, असे या महिलांनी खडसावले आहे. तुम्हाला गाववाला म्हणून गरिबाच्या बाजूने घेतला होता. मात्र गाववाल्यानेच गरिबांची फसवणूक केली.

आम्ही मत द्यायचे पैसे घेत नाही. जे घेतात त्यांना जाऊन सांगा हे सगळे! आम्हाला बोलू नका, असे प्रत्युत्तर या महिलांना आमदारांना व्हिडिओतून (Video) दिले आहे. आमच्या जागेवर कंपाऊंड घालताना हा वाद झाला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी गुजराती विकासकाला जागा दिली आहे. नवनवीन बिल्डर येतात, टोकन देतात आणि आमची फसवणूक करतात. खोटेपणा करून वकिलाच्या मार्फत सातबारा फिरवून घेतला आणि आमच्यावर अत्याचार सुरू आहेत, असा गंभीर आरोप या महिलांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

द्वारली गावातील प्रकरण

या महिला द्वारली गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील असून सदर जमीन द्वारली गाव येथील नव्याने सुरू होणाऱ्या आरटीओ कार्यालयाशेजारील आहे.

आमदार गायकवाडांनी आरोप फेटाळले

त्या लोकांनी तीन वेळा जागेचे पैसे घेतले आहे. ते लोक पलटी मारत आहेत. कोर्टातून केस देखील आम्ही जिंकलो आहोत. तरी देखील महिला आमच्यावर खोटा आरोप करत असल्याचे भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

(Edited by Avinash Chandane)

MLA Ganapat Gaikawad
Shivsena Banner Dombivli : ठाकरे गटाचे भावनिक आवाहन, बॅनर लावून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com