उद्धवजी, एक तरी सभा टोमण्याशिवाय घेऊन दाखवा ; प्रवीण दरेकरांचे आव्हान

संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यांना आता पराभव दिसू लागला त्यामुळे ते आता बोलत आहेत.
Uddhav Thackeray, Pravin Darekar
Uddhav Thackeray, Pravin Darekar sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबाद शहरात सभा होणार आहे. त्या अनुषंगाने शिवसेना मोठ्या प्रमाणात कामाला लागल्याचे चित्र औरंगाबादमध्ये आहे. या सभेकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे.

या सभेत मुख्यमंत्र्यांच्या (Uddhav Thackeray) रडारवर कोण असेल, याबाबत उत्सुकता आहे. या सभेपूर्वी भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना डिवचलं आहे. दरेकर माध्यमांशी बोलत होते. (Pravin Darekar latest news)

औरंगाबादच्या इतिहासामध्ये प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्याच सभेनंतर महानगरपालिकेवर शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. त्याच मैदानावर आता पुन्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन ८ जून रोजी करण्यात आले.

"औरंगाबादला पुन्हा एकदा टोमण्याची सभा होते का हे बघावे लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तरी सभा टोमण्याशिवाय करून दाखवावी," अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या यापूर्वीच्या भाषणावरुन खिल्ली उठवली आहे.

Uddhav Thackeray, Pravin Darekar
राज्यसभा निवडणुकीची धामधूम : कोरोना रुग्णांची वाढ, मतदानाचं काय होणार?

काही दिवसापूर्वी मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका केली आहे. गजानन काळे यांनी टि्वट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ८ जूनच्या सभेत देतील का? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.

"बाबरी मशीद पडली म्हणून मुस्लिम समाजाची माफी मागणाऱ्या मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमीसोबत सत्तेचा पाट का मांडला ? संभाजीनगरला शिवसेनेचा विधानपरिषदेचा आमदार अंबादास दानवे एमआयएमच्या नगरसेवकांची मदत घेऊन का करावा लागला ? याचे उत्तर संभाजीनगरच्या ८ जुन ला होणाऱ्या "टोमणे सभेत"ढोंगी हिंदुत्ववादी देणार का ? अशी विचारणा काळे यांनी टि्वटमध्ये केली आहे.

Uddhav Thackeray, Pravin Darekar
मोठी बातमी : पंजाबी गायक सिद्धू मुसावालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन

प्रवीण दरेकर म्हणाले, "राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वसुलीचे टार्गेट दिल्यानंतर अधिकारी कोणत्या मानसिकतेमध्ये काम करणार, रोज कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे,"

"शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे पक्षात अवमूल्यन सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना न घेता संजय राऊत पत्रकार परिषद घेतात, हा सच्चा शिवसैनिकांचा अवमान आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यांना आता पराभव दिसू लागला त्यामुळे ते आता बोलत आहेत. भाजपचा आमदार पक्षाशी एकनिष्ठ आहे," असे दरेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com