BJP Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या ठाकरेंना दे धक्का! बालेकिल्ल्यात 'डॅमेज कंट्रोल', विकास म्हात्रेंचे मन वळवले

BJP Ravindra Chavan Vikas Mhatre : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार असल्याच्या चर्चा होत्या.
Devendra Fadnavis Ravindra Chavan Vikas Mhatre
Devendra Fadnavis Ravindra Chavan Vikas Mhatresararnama
Published on
Updated on

Vikas Mhatre News : डोंबिवली विधानसभेचे भाजप आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत आपली नाराजी जाहीर उघड करत भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी सपत्नीक पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. त्यांची नाराजी दूर होत नसल्याने ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी अटकळ बांधली जात होती.

म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. मात्र, जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मध्यस्थी करत म्हात्रे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घडवून देत म्हात्रे यांची नाराजी दूर केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही म्हात्रे यांनी भेट घेतल्या नंतर भाजपा पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा प्रभागाचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी सपत्नीक भाजप पदाधिकारी आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा कल्याण जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे दिला होता.

राष्ट्रवादीमधून थेट भाजपमध्ये आल्यावर भाजपने म्हात्रे यांना घरात दोन नगरसेवक पदे दिली, भाजपमधील ज्येष्ठांना डावलून कल्याण डोंबिवली पालिकेतील मानाचे स्थायी समितीचे सभापती पद देऊ केले, गटनेते पद दिले होते. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आमदार निधीतील कोट्यवधी रूपयांचा निधी प्रभागातील सिमेंट काँक्रीट रस्ते आणि चौपाटी विकास कामांसाठी म्हात्रे यांनी मिळवला होता. भाजपने एवढा मान दिला असताना प्रदेशाध्यक्षांवर थेट आरोप करत म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

याआधी ही एकदा त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. म्हात्रे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेना जोरदार प्रयत्न करत होते. ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेआमदार राजेश मोरे यांनी म्हात्रे यांची भेट देखील घेतली होती.

Devendra Fadnavis Ravindra Chavan Vikas Mhatre
Shivsena UBT vs BJP : "गांडूंचे राज्य गांडू लोकांसाठी"; निशिकांत दुबेंवर टीका करताना राऊतांनी PM मोदींपासून शिंदेपर्यंत सर्वांना फटकारलं...

नंदू परब यांची यशस्वी मध्यस्थी

राज्याचे गृहमंत्री पद भाजपकडे, तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असताना विकास म्हात्रे यांनी भाजप सोडण्याची तयारी केल्याने त्यांची कोंडी येत्या काळात होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसेच म्हात्रे हे इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत असल्याने काही भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याबरोबर म्हात्रे यांची यशस्वी मध्यस्थी केली.

म्हात्रे यांच्या प्रश्नांचे निरसन

या मध्यस्थीमधून सोमवारी रात्री मुंबईत जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या पुढाकाराने म्हात्रे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. म्हात्रे यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्यांचे गैरसमज दूर करण्यात आले. या भेटीनंतर समाधान झाल्याने म्हात्रे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी विकास म्हात्रे यांनी भेट घेतली.

नंदू परब यांनी सांगितले की, विकास म्हात्रे यांचा पक्षातील वरिष्ठांच्या भेटीतून गैरसमज दूर करण्यात आला आहे. त्यांचा विकास कामांचा निधी प्रस्तावित आहे तो त्यांना मिळणार आहे. ते आता यापुढे भाजपमध्येच निष्ठेने काम करतील.

Devendra Fadnavis Ravindra Chavan Vikas Mhatre
Sunil Shelke: राष्ट्रवादीचे आमदार सांगताहेत तंदुरुस्त राहण्यासाठीच्या टिप्स; ‘फिटनेस’ हाच कार्यक्षमतेचा पाया!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com