ठाकरे सरकारचा माज उतरवणार ; मुनगंटीवारांचा हल्लाबोल

सचिन वाझे तर यांना सख्या भावाप्रमाणे वाटत होता. हे विधान भवनात त्याची बाजू मांडत आहेत हे लोक सचिन वाझेचे वकील बनले होते,
Sudhir Mungantiwar,Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar,Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''वीस वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पण रस्त्यावरून जातात गाडी व्हायब्रट मोडवर जाते. इतर महानगरात जेवढे खड्डे नाहीत त्यापेक्षा जास्त खड्डे मुंबईत आहेत. रस्ते विकाससाठी बजेट वाढले. पण पावसात मुंबईला लोक 'तुंबई' म्हणतात,'' असा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला. ''हे म्हणतात पंचवीस वर्षे भाजपची सत्ता येणार नाही, यांचा सत्तेचा माज उतरवू,'' असा इशारा मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिला. ते माध्यमांशी बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, ''मुंबईत पायाभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. राणीच्या बागेत पेंग्विन आणले तर पर्यटन वाढेल असे वाटत असेल तर आपण कुठे तरी चुकतोय.

घोषणा मोठ्या झाल्यात पण त्या सर्व फोल ठरल्या आहेत. मुंबईत समाधान कमी दिसेल तर याला फक्त शिवसेना जबाबदार असेल. किराणा दुकानात वाईन विकणाऱ्यांना निवडणुकीत मात्र फाईन बसेल,''

Sudhir Mungantiwar,Uddhav Thackeray
''मैं जिंदा हूं' असं म्हणणाऱ्या 'मृत' उमेदवाराचा अर्ज रद्द

ईडीच्या चौकशीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. यावर मुनगंटीवार म्हणाले, ''सर्व पोलीस यंत्रणा संपवण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे. यादीनुसार बदल्या झाल्याची नोंद न्यायालयानं केली आहे. त्यामुळे हा व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मी यासंदर्भात विधान सभेत प्रश्न विचारताना सुप्रीम कोर्टांने कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. सचिन वाझे तर यांना सख्या भावाप्रमाणे वाटत होता. हे विधान भवनात त्याची बाजू मांडत आहेत हे लोक सचिन वाझेचे वकील बनले होते,

Sudhir Mungantiwar,Uddhav Thackeray
धक्कादायक : उमेदवारी अर्ज भरताना योगींच्या मंत्र्यावर जीवघेणा हल्ला

नवाब मलिकांवर मुनगंटीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, ''तुम्ही स्वतःला महात्मा गांधीजींच्या विचाराचे सरकार म्हणतात अन् अशी विधान करतात. भाजपचे नेते पितात म्हणून वाईन सोयीसाठी करता का,''

नवाब साहेब, हर्बल गांजावाले, नशा सत्तेची असल्यानं असं बिन बुचाचं सुचतयं

मुंबई : किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे भाजपचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खोतांनी टि्वट करीत मलिकांवर निशाणा साधला आहे.

दोन दिवसापूर्वी नवाब मलिक म्हणाले होते की, भाजपचे नेते विखे पाटील यांचा दारूचा रॉकेट ब्रॅण्ड आहे. तसंच भाजपचे नेते हे बंद करणार आहेत का ? भाजपच्या नेत्यांची वाईनची दुकाने आहेत ती बंद करणार आहेत का? असा सवाल उपस्थित करतच दारू पिणारे सगळ्यात जास्त भाजपचे नेते आहेत. दारू म्हणजे औषध आहे. ”थोडी थोडी पिया करो” असा मंत्र चार दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंग यांनीच दिला आहे.

“सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये असल्याचे नवाब मलिक म्हणतात. व्वारे.. व्वा.. नवाब साहेब, हर्बल गांजा वाले आपली नशा सत्तेची असल्याने असं बिन बुचाचं सुचतयं आहे. प्रश्न कोण दारू पीत आहे हा नाही तर, दारू कुठे विक्री साठी उपलब्ध करून दिली जात आहे याचा आहे”, असे टि्वट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com