Amit Shah cooperative insurance : अमित शाह यांचा 'मेगा प्लॅन'; सहकार क्षेत्रात आता विमा कंपनी

Amit Shah Announces Cooperative Insurance Company at NAFED Mumbai Seminar : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी मुंबईत 'सहकार से समृद्धी', विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद सहभागी झाले होते.
Amit Shah cooperative insurance
Amit Shah cooperative insuranceSarkarnama
Published on
Updated on

Nafed Mumbai event 2025 : भाजप नेते केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकारमार्फत ग्रामीण विकासाचा आराखडा मांडताना, सहकारला कॉर्पोरेट लूक देण्याचा मनोदय मुंबईत बोलून दाखवला.

'दहा वर्षांत कृषी निर्यात, सेंद्रिय अन्न आणि दूध या क्षेत्रात अमूल, कृभको आणि नाफेड या महाकाय संस्था होतील. तसेच सहकार क्षेत्राची विमा कंपनीही स्थापन करू,’ असा सहकारामार्फत ग्रामीण भारताच्या समृद्धीचा आराखडा अमित शाह यांनी मांडला.

नाफेडतर्फे ‘सहकार से समृद्धी’ या विषयावरील मुंबईत (Mumbai) राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते. जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाच्या विक्रीसाठी नाफेडकडे नोंद केली तर तो शेतमाल नाफेड ‘एमएसपी’ने खरेदी करेल आणि बाजारभाव जास्त असेल तर शेतकरी बाजारात माल थेट विकू शकतील, अशी योजना आल्याचेही शाह यांनी सांगितले.

लवकरच देशात 2 लाख नव्या पॅक्स निर्माण झाल्यावर देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पॅक्स असतील. त्यानंतर या संस्था, जन औषध केंद्र, पेट्रोल पंप, गॅस वितरण, नळ योजनांची देखभाल, गोदामे, सहकारी टॅक्सी, विमान-रेल्वेचे बुकिंग आदी 24 कामे करू शकतील, असे अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितले.

Amit Shah cooperative insurance
Bachchu Kadu Amravati protest : बच्चू कडूंचा 'प्रहार'; सरकार लागलं कामाला

इथेनॉल पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपर्यंत मिसळता येणार

याशिवाय तेथूनच जन्म-मृत्यू प्रमाणपत्रही मिळतील. राज्य आणि केंद्र सरकार यांच्या 300 योजनांचे केंद्र पॅक्स असेल.’ सहकार क्षेत्रामार्फत मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यासाठी मोठे ट्रॉलर देत असून दूध उत्पादकांनाही आम्ही सहाय्य करीत आहोत. मक्यापासून इथेनॉल तयार करून ते पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपर्यंत मिसळण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती शाह यांनी दिली.

Amit Shah cooperative insurance
Nitesh Rane: उद्धव ठाकरेंकडून 'पेंंग्विन'ची उपमा; संतापलेल्या नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणारी ती प्रकरणंच काढली

‘पॅक्स’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाराच्या वेगवेगळ्या योजना देशात सुरू असल्यामुळे सहकाराचे वेगळे स्वरूप महाराष्ट्रात दिसत आहे. केंद्राच्या ठरवलेल्या लक्ष्यापेक्षाही जास्त काम महाराष्ट्रात केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि रोजगार मिळाला आहे. तर ‘पॅक्स’मुळे गावागावात ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असून यापुढेही सहकार मानकांमध्ये महाराष्ट्र देशात अग्रभागी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

चार कंपन्यांना निधी वितरण

केंद्र सरकारच्या दहा हजार एफपीओ स्थापना व विकास योजनेंतर्गत नाफेड आणि सीबीबीओ सिमासेस लर्निंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या चार शेतकरी कंपन्यांना इक्विटी ग्रँट निधीचे वितरणही अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. यात पुण्यातील सिल्कबेरी फेड एफपीसी, नवतोरणा फेड एफपीसी, वेलवंडी फेड एफपीसी आणि नाशिकमधील सप्तभूमी फेड एफपीसी या कंपन्यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com