Mumbai News, 17 Nov : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांच्याच एका वाक्याची आठवण करून देत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं बोलले होते की, मी दिल्लीची लाचारी करणार नाही, दिल्लीचे बूट चाटणार नाही. कमळाबाईला सुद्धा मी त्यांची जागा दाखवीन. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात त्यांची मुजरेगिरी करताहेत हे बाळासाहेबांना मान्य नव्हतं.", असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
दरम्यान, यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "बाळासाहेबांनी कधीच काँग्रेसचा (Congress) तिरस्कार केला नाही. त्यांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी पाठिंबा दिला होता." तसंच यावेळी त्यांनी आम्ही ही निवडणूक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने नावाने लढत असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, ज्या कार्यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली होती. तो मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान मागील अडीच वर्षात संकटात आहे. महाराष्ट्रावर गुजरातने आक्रमक केलं आहे आणि आमचे राज्यकर्ते गुजरातची लाचारी करत आहेत. हा विचार बाळासाहेबांचा नव्हता. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) आम्हाला ताठ कना दिला, त्यांनी आम्हाला संघर्ष आणि संकटावर मात करायला शिकवलं.
ते म्हणायचे एक वेळ लढला नाहीस तरी चालेल पण स्वतःला विकू नको, आज या सगळ्याची आम्हाला आठवण येत आहे, असं म्हणत राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी दिली नाही यावरूनही मनसेवर निशाणा साधला.
ते म्हणाले "शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे इथे आज दिवसभरात लाखो लोक येतील. परंपरेनुसार आम्हाला सभेसाठी परवानगी मिळायला पाहिजे होती. मात्र, शिवसेनेला (Shivsena) शिवतीर्थावर सभा गेल्यापासून रोखण्यात आलं. याला तुम्ही काय म्हणू शकता? याला तुम्ही जळफळाट किंवा एक विकृती असंच म्हणावं लागेल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.