भाजपच्या आशिष शेलारांनी सांगितले राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण...

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक या गोष्टींची या भेटीला पार्श्वभूमी आहे.
Ashish Shelar- Raj Thackeray
Ashish Shelar- Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज (ता. ५ नोव्हेंबर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी मागील काही महिन्यांपासून होत असलेली भाजप-मनसे युतीच्या चर्चेची पार्श्वभूमी या भेटीला आहे. (BJP's Ashish Shelar told the reason for Raj Thackeray's visit...)

कोरोनातून नुकतेच बरे झालेले राज ठाकरे यांच्या भेटीसाठी माजी मंत्री आशिष शेलार हे सकाळीच पोचले. कृष्णकुंज या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. कोरोनातून ते आताच बाहेर पडले आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शेलार कृष्णकुंजवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. शेलार आणि राज यांची ही सदिच्छा भेट असल्याचे दोन बाजूकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची चर्चा रंगली आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक या गोष्टींची या भेटीला पार्श्वभूमी आहे. त्याचबरोबर जेव्हा दोन राजकीय नेते एकमेकांना भेटतात, त्या वेळी राजकीय चर्चा होणे स्वभाविक आहे.

Ashish Shelar- Raj Thackeray
विधान परिषदेसाठी कॉंग्रेसकडून तीन नावांची शिफारस

राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यातच भाजपबरोबर मनसेची युती होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली आहे. त्यातच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ashish Shelar- Raj Thackeray
पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली : कोणत्या दिग्गजांना थांबवायचे?

राज ठाकरे यांच्या भेटीबाबत आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, राजकारणापेक्षाही दिवाळीत एकमेकांना भेटायचे होते. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती. पे. पेंग्विन प्रकाशनाचे बुक ऑन मुव्ही हे पुस्तकही मी त्यांना भेट दिले. जगभरातील १०० चांगल्या चित्रपटांवरचे हे पुस्तक आहे. तसेच ते कोरोनातून आताच बरे झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या तब्येतीचीही चौकशी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com