पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली : कोणत्या दिग्गजांना थांबवायचे?

सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत माघारीसाठी नेत्यांना कसरत करावी लागणार
Sangli jillha Bank
Sangli jillha Banksarkarnama
Published on
Updated on

सांगली : दिवाळीच्या चार दिवसांच्या सुटीनंतर सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघारीचे नाट्य रंगणार आहे. अर्ज माघारीसाठी नऊ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. माघारीसाठी आठ व नऊ नोव्हेंबर हे दोनच दिवस उमेदवारांच्या हातात असणार आहेत. सर्वच पक्षातील नेतेमंडळींना माघारीसाठी कसरत करावी लागेल. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या दिग्गजांपैकी कोण माघार घेणार? याकडेही लक्ष लागले आहे. (Leaders will have to work hard to withdraw in the Sangli District Bank elections)

सांगली जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत नेतेमंडळींच्या दोन पॅनेलमध्ये लढत झाली होती. यंदाच्या निवडणुकीला थोडा पक्षीय रंग आला आहे. भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचे पॅनेल जवळपास निश्‍चित झाले आहे. अंतिम जागावाटप मात्र अद्याप बाकी आहे. शिवसेनेला जादा जागा देण्यावरून निर्णय प्रलंबित राहिला आहे.

Sangli jillha Bank
अनिल देशमुखांची ईडीकडून पुन्हा चार तास चौकशी; शेल्ड कंपन्यांबाबत विचारणा

दुसरीकडे, भाजपनेही स्वबळाचा नारा देत बँकेच्या २१ पैकी २० जागा लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा देखील केली आहे. सद्यस्थितीत निवडणूक महाआघाडी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची चिन्हे आहेत. बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी असून, अद्याप भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली नाही. भाजपला सोबत घेण्यास काँग्रेस व शिवसेनेचा विरोध असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Sangli jillha Bank
‘कृष्णकुंज’ सोडण्याचा राज ठाकरेंचा निर्णय

बँकेच्या २१ जागांसाठी ३१६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. काहींनी माघार घेतली आहे. आता दिवाळीची सुटी रविवारपर्यंत असणार आहे. त्यानंतर अर्ज माघारीसाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. रविवारी महाआघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. भाजपनेदेखील ९ तारखेपूर्वी बैठक होऊन अंतिम यादी जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे चारही प्रमुख पक्षातील नेतेमंडळींना उमेदवारांनी अर्ज माघार घेण्यासाठी, तसेच अंतिम यादी निश्‍चित करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

विद्यमानपैकी कोण माघार घेणार?

विद्यमान २१ संचालकांपैकी तिघा संचालकांनी अर्जच दाखल केले नाहीत, त्यामुळे उर्वरित १८ संचालकांपैकी कोण माघार घेणार? याकडे लक्ष लागले आहे. नव्या संचालक मंडळात जुने चेहरे किती असणार? याचीही उत्सुकता आहे. आणखी किमान तीन उमेदवारांना तरी माघार घ्यावी लागणार असल्याची परिस्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com