Bhiwandi Lok Sabha Exit Poll : दिल्लीला निघालेल्या 'बाळ्यामामा'ची धाव भिवंडीतच!

Kapil Patil Vs Suresh Mhatre : राहुल गांधींचा दौरा येवो नाही तर अजून काही येवो, असा विश्वास कपिल पाटील यांनी आधीच व्यक्त केलेला आहे.
Kapil Patil and Suresh Mhatre
Kapil Patil and Suresh MhatreSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Lok Sabha Constituency Exit Poll Result : मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी असा पक्ष बदलांचा प्रवास करणाऱ्या सुरेश उर्फ बाळ्यामामाला यंदाही भिवंडी लोकसभा निवडणुकीत टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, तर भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील पुन्हा कमळ फुलवण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसत आहे.

2024ला फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार चारसौ पार. यामुळे राहुल गांधींचा दौरा येवो नाही तर अजून काही येवो, भिवंडी लोकसभेच्या निकालात काही फरक पडत नाही,' असा ठाम विश्वास कपिल पाटील(Kapil Patil) यांनी व्यक्त केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश म्हात्रे(Suresh Mhatre) यांनी 2014 मध्ये मनसेकडून उमेदवारी घेत कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत, तब्बल सव्वा लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं. 2019 मध्येही पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता.

Kapil Patil and Suresh Mhatre
Loksabha Election Exit Poll : उत्तर- मध्य मुंबईत भाजपला उमेदवार बदलण्याचा फटका!, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर

यावेळी ते शिवसेनेत होते परंतु सेना-भाजप युती असल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती. तेव्हा त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचेही प्रयत्न केले होते. परंतु काँग्रेसमधीलच नेत्यांकडून विरोध झाल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. अखेर आता 2024मध्ये त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळण्यात यश मिळवलं आणि निवडणूक लढवली.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा सातवा टप्पा शनिवारी पार पडला. आता सर्वांनाच 4 जून रोजीच्या निकालाची उत्सुकता आहे. तत्पुर्वी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दर्शवले आहे.

Kapil Patil and Suresh Mhatre
Thane Lok Sabha Exit Poll : नरेश म्हस्के ठाण्यातच घालवणार एकनाथ शिंदेंचं नाव?

टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 353-368, इंडिया आघाढी 118-133, इतर 43-48 जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. तर महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 तर अपक्ष एका जागेवर दिसत आहे. यामध्ये भाजप - 18, शिवसेना -04, राष्ट्रवादी - 00, काँग्रेस - 05, ठाकरे गट - 14, पवार गट - 06 जागा दिसत आहे. यावरून भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com