मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी बजेट आज आयुक्त आणि प्रशासक इक्बाल चहल यांनी सादर केला. मुंबई महापालिकेचा रेंगाळलेली निवडणूक आणि राजकीय नेत्यांना लागलेले निवडणुकीचे वेध लक्षात घेऊन या बजेटमधून मुंबईकरांना काय मिळणार, याची सर्वांनाच उत्कंठा होती. शिवाय हा बजेट किती मोठा असेल, याचीही सर्वांना उत्सुकता होती. तर यावेळचा मुंबई महापालिकेचे बजेट आहे तब्बल 59 हजार 954 कोटी 75 लाख रुपयांचे. मणिपूर आणि मेघालय या दोन राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचा बजेटचा आवाका प्रचंड असल्याचे यावेळीही दिसून आहे.
मुंबई महापालिकेने (BMC) यावेळी भर दिला आहे तो मुंबईकरांच्या आरोग्यावर. बजेटच्या 12 टक्के म्हणजे 7 हजार 191 कोटींचा खर्च मुंबई स्वच्छ राहावी, हरित दिसावी आणि मुंबईकर फिट असावेत, यावर केला जाणार आहे. 59 हजार 954 कोटी 75 लाख रुपयांच्या बजेटमध्ये (BMC Budget 2024) मुंबई स्वच्छ, हिरवीगार आणि जगण्यासाठी आकांक्षा ठेवण्यासाठी नागरी सुविधा सक्षम करणासाठी तब्बल 31 हजार 774 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईकर वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे त्रस्त आहेत, आरोग्याची हेंडसाळ होते शिवाय गार्डनच्या देखभालींकडे दुर्लक्ष होते, या मुंबईकरांच्या तक्रारी या बजेटमधून दूर होऊ शकतील, अशी अपेक्षा आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
** झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी - 500 कोटी
महापालिकेच्या रुग्णालयांमधील औषधांच्या वेळापत्रकात सर्व आवश्यक औषधे समाविष्ट करण्याचा निर्णय
** धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना - 507.98 कोटी
महापालिका हद्दीतील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य योजना
** बचतगटांना मदत
1600 बचत गटांना प्रति गट 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय
** स्वच्छतेसाठी हेल्पलाईन
मुंबईकरांच्या स्वच्छतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'मुख्यमंत्र्यांची स्वच्छ मुंबई' हेल्पलाईन
** डीप क्लीनिंगसाठी 61 गुणांची मानक कार्यप्रणाली (SOP) विकसित
** हरित मुंबई
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार
** बांबू रोपांची लागवड
मुंबईत सुमारे 5 लाख बांबू रोपे लावण्याचा संकल्प
** ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र
प्रत्येक झोनमध्ये एक अशी सात विरंगुळा केंद्र स्थापन करणार
** महिला सुरक्षा - 100 कोटी
* एकूण महसूल उत्पन्न - 35 हजार 749.03 कोटी
* एकूण महसुली खर्च - 28 हजार 121.94 कोटी
* एकूण भांडवली खर्च - 31 हजार 774.59 कोटी
* भांडवली खर्च आणि महसूल खर्चाचे गुणोत्तर - 53 : 47
* मालमत्ता करातून उत्पन्न - 4 हजार 950 कोटी
* विकास नियोजनातील उत्पन्न - 5 हजार 800.00 कोटी
* आरोग्य बजेट - 7 हजार 191.13 कोटी
* डी.पी. अंमलबजावणी क्षेत्र - 7 हजार 11.41 कोटी
* प्राथमिक शिक्षण - 3 हजार 497.82 कोटी
* रस्त्यांची सुधारणा - 3 हजार 200 कोटी
* SWM स्टाफ क्वार्टर्सचा पुनर्विकास - 1 हजार 55 कोटी
* BEST ला आर्थिक अनुदान - 228 कोटी 65 लाख
* पूल विभाग - 4 हजार 830 कोटी.
* उद्यान आणि प्राणीसंग्रहालय - 252 कोटी 80 लाख
* कोस्टल रोड प्रकल्प - 2 हजार 900 कोटी
* दहिसर-भाईंदर लिंक रोड - 220 कोटी
* मुंबई कोस्टल रोड (उत्तर) वर्सोवा ते दहिसर - 1 हजार 130 कोटी
* गोरेगाव-मुलुंड लिंक रोड - 1 हजार 870 कोटी
* सीवरेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट - 4 हजार 90 कोटी
* वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट
* मुंबई कोस्टल रोड वर्सोवा इंटरचेंज ते दहिसर इंटरचेंज आणि GMLR - 35 हजार 955 कोटी
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.