मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे संबंध कसे होते, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठावूक आहेत. एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे यांच्याबद्दल असलेला आदर नेहमी दिसतो. नवरात्र असो किंवा दहीहंडी ठाण्याच्या आनंदाश्रमात मोठी वर्दळ असते. शिंदेंवरील आनंद दिघेंचा प्रभावाची कायम चर्चा असताना आता याचं रिफ्लेक्शन मुंबई महापालिकेच्या बजेटमध्येही दिसून आलं आहे.
मुंबई महापालिकेच्या या बजेटमध्ये (BMC Budget 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे गुरू आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नावानं योजना सुरू करण्यात येत आहे. मुंबई महापालिका (BMC) 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 'धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना' सुरू करत आहे. या बजेटवर एकनाथ शिंदे यांचा पूर्ण प्रभाव जाणवतोय. म्हणूनच दिव्यांग अर्थसहाय्य योजनेला आनंद दिघे यांचं नाव देण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई महापालिकेच्या बजेटला खूप महत्त्व आहे. बीएमसीचं (BMC) बजेट हे ईशान्येकडील एखाद्या राज्यापेक्षा मोठं आहे. एवढंच नाही तर बीएमसीच्या मुदत ठेवीमध्ये अंदाजे 90 हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे बीएमसीच्या बजेटमध्ये काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. आता आनंद दिघे यांच्या नावानं योजना सुरू करून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात आनंद दिघेंचं स्थान अबाधित आहे. आनंद दिघे यांची प्रतिमा धर्मवीर अशी राहिली आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांची महाराष्ट्राला आणि नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला आणि त्यानंतर घडलेलं राजकीय नाट्यही महाराष्ट्रासह संपूर्ण देशानं पाहिलं.
एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले नेते आहे. दिघेंचा प्रचंड जनसंपर्क, लोकसेवेसाठी रात्रंदिवस काम करण्याची वृत्ती, जनमानसावर असलेलं गारूड शिंदेंनेही आत्मसात केलं. आज आनंद दिघेंप्रमाणे एकनाथ शिंदेंचीही प्रतिमा जनमानसात आकार घेत आहे.
धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेत मुंबई महापालिकेने 507.98 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 59 हजार 115 दिव्यांगांना अर्थसहाय्य केलं जाणार आहे. ही योजना मुंबई महापालिका हद्दीतील 18 वर्षांवरील दिव्यांगांसाठी आहे.
यात पिवळे रेशनकार्डधारकांना (40 ते 80 टक्क्यांपर्यंत दिव्यांग) सहामाही 6 हजार रुपये मिळतील, तर निळे कार्डधारक दिव्यांगांना (80 टक्क्यांहून अधिक दिव्यांग ) सहामाही 18 हजार रुपये दिले जातील.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.