Mumbai : प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत समावेश करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. वंचितच्या नेत्यांसोबत महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक सुद्धा झाली होती. मात्र, आपला अजूनतरी महाविकास आघाडीत समावेश झाला नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दोन फेब्रुवारीला बैठक आहे. त्यामध्ये निर्णय होईल, आपण आपली बाजू मांडू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
ही बैठक आज (ता.2) होत असून या बैठकीत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असणार की नाही, याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, संजय राऊत यांनी वंचितचा समावेश महाविकास आघाडीत झाला असल्याचा दावा केला आहे. (Prakash Ambedkar Meeting Mahavikas Aghadi )
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृतपणे समावेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी चर्चेला आज एकत्र बसणार आहोत. महाराष्ट्रातून भाजपची हुकूमशाही हद्दपार करण्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांची जी मदत आहे ती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, असे शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या बैठकीच्या निमित्ताने सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत समावेशासाठी पत्र देण्यात आले होते. त्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही होती. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला. आपल्याला सांगण्यात आले की महाविकास आघाडीच्या समावेशा बाबत निर्णय हे काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले आहेत. मग, पत्रावर नाना पटोले यांची सही कशी? थोरात किंवा चव्हाण यांची पत्रावर सही नसल्याने मी वंचितचा समावेश महाविकास आघाडीत झाला असल्याचे मानायला तयार नाही, असे देखील आंबेडकर म्हणाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात येतो आहे. त्यावर ज्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजप बोलत होता. त्यांचीच फाईल हरवल्याचे सांगून त्यांना भाजपचा चेहरा बनवू शकतात. अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी त्यांचे चेहरे बनले आहेत.जो भ्रष्टाचारी चेहरा भाजप बरोबर जाईल तो पवित्र चेहरा बनेल. भ्रष्टाचार हा भाजपचा चेहरा आहे आणि राहणार, असे ठणकावून राऊत यांनी सांगितले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.