BMC Covid Scam : आर्थिक गुन्हे शाखेकडून महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स ; आज जबाब नोंदवणार

Covid Scam News : काही दिवसांपूर्वी रमाकांत बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
BMC Covid Scam
BMC Covid ScamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : कोरोना काळातील बॉडी बॅग गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार (Ramakant Biradar) यांना समन्स बजावले आहे. आज (शुक्रवारी) आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी बिरादार यांचा जबाब नोंदवणार आहेत.

सध्या बिरादार हे उपमहापालिका आयुक्त झोन 2 आहेत. कोविड काळात ते केंद्रीय खरेदी विभागाचे प्रभारी होते. रमाकांत बिरादार यांचा जबाब यापूर्वी ईडीने नोंदवला आहे. याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BMC Covid Scam
Sanjay raut News : "याद राखा, आमचेच सरकार येईल, कारवायांची किंमत मोजावी लागेल” ; राऊतांची तपास यंत्रणांनाच दमबाजी

आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी रमाकांत बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे.किशोरी पेडणकर यांना न्यायालयाकडून नुकताच दिलासा देण्यात आला आहे. पेडणेकर यांनी २९ ऑगस्टपर्यंत अटक करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

कोरोना संसर्गाच्यावेळी कोव्हिड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. बॉडी बॅग खरेदीतही घोटाळा झाला होता.

BMC Covid Scam
Samruddhi Mahamarg News: शिंदे - फडणवीसांच्या 'ड्रिम प्रोजेक्ट' ला 'ब्रेक'; 'समृद्धी' वरील वाहतूक थांबवा; न्यायालयात याचिका दाखल

बॉडी बॅग खरेदीबाबत यापूर्वी ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली होती. त्यानुसार 2 हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आली होती. हे कंत्राट देताना महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. या प्रकरणी हा गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com