शेलारांच्या ट्विटची BMC ने तात्काळ घेतली दखल! २४ तासांत पावलं उचलत महत्वाचा निर्णय जाहीर

Ashish Shelar | BJP | Mumbai | BMC | Shivsena : आशिष शेलार यांच्या ट्विटवर मुंबई पालिका प्रशासनाची कारवाई
Ashish  Shelar
Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी काल केलेल्या ट्विटची मुंबई महापालिकेने २४ तासांच्या आतच दखल घेवून तात्काळ पावलं उचलली आहेत. शेलार यांनी आज स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेलं नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी १५ एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे ३७५ किलोमीटरचे नाले अवघ्या दीड महिन्यात कसे साफ होणार?, असा सवाल भाजपाचे आशिष शेलार यांनी केला होता. मात्र शेलारांच्या या ट्विटनंतर या कामासाठी महापालिकेने मंजुरी दिली असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते शेलार?

दरवर्षी मार्च महिन्यात मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेले नाही. त्यामुळे आता जरी मंजुरी दिली तरी १५ एप्रिल नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुमारे ३७५ किलोमीटरचे नाले अवघ्या दिड महिन्यात कसे साफ होणार? ७ मार्चला स्थायी समितीत १६० कोटींचा प्रस्ताव आला, पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. मुदत संपली आणि मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी फरार. का प्रस्ताव राखून ठेवला? काही अंडरस्टॅंडिंग बाकी होते का? हे असले कारभारी. मुंबईकरांपेक्षा स्वतःच्याच मालमत्तांची चिंता भारी! अशी टीका शेलार यांनी केली होती.

आज दिली कामाला मंजुरी :

आशिष शेलार यांनी ट्विट करुन मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या आज कामांना मंजुरी दिली असल्याचे सांगितले आहे. याशिवाय त्यांनी यावेळी यशवंत जाधव प्रकरणावरुन शिवसेनेले टोला देखील लगावला आहे. ते म्हणाले, सत्ताधीशांकडे "पन्नास लाखांचे घड्याळ" असले तरी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचे टायमिंग चुकले होते. अखेर भाजपाला गजर करावा लागला. पालिका प्रशासन जागे झाले, नालेसफाईच्या कामांना मंजुरी मिळाली. आता गाळ काढण्याच्या कामावर करडी नजर राहिलच. कारण भाजपासाठी "मातोश्री" (आई) मुंबईकरच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com