BMCC Covid scam News : कोविडच्या चौकशीला BMCC चे अधिकारी घाबरले..; शिंदे-फडणवीसांकडे धाव

Covid scam : महापालिका अधिकाऱ्यांची खच्चीकरण होत असल्याचे अधिकारी कर्मचारी वर्गाचे म्हणणं आहे.
BMC Covid Scam
BMC Covid ScamSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : काही दिवसांपासून मुंबई महापालिकेतील काही अधिकार्‍यांची चौकशी सुरू आहे. राजकीय लढाईत अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत मुंबई महापालिकेतील काही उपायुक्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले आहे.

BMC Covid Scam
Monsoon Session : मणिपूरच्या मुद्द्यावरून पेटलेल्या अधिवेशनाचे आज सूप वाजणार ; अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाबाबत काँग्रेस आक्रमक..

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार बीएमसी मधील काही उपायुक्तांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.काही उपायुक्तांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर म्हणणे मांडले. तर काही उपायुक्तांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची अधिकारी भेट घेत असताना दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या संघटनांनी येत्या २३ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे कर्मचाऱ्यामध्ये संभ्रम आहे. २३ ॲागस्टला आंदोलनानंतर संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

BMC Covid Scam
NCP On Modi LokSabha Speech: मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; सुळे म्हणाल्या, "दीड तासांच्या भाषणात ते फक्त ‘इंडिया’वर...

तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.चौकशीमुळे महापालिका अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असल्याचे अधिकारी कर्मचारी वर्गाचे म्हणणं आहे.

कोरोना काळात मुंबई महापालिकेने घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही गेल्या काही महिन्यांपासून विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच आर्थिक गुन्हे शाखेनेही माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात एक अतिरिक्त आयुक्त व एक उपायुक्त यांचा समावेश आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com