Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंना आक्षेपार्ह विधानाप्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Bombay High Court : संभाजी भिडे यांचे नाव याचिकेतून वगळण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
Sambhaji Bhide
Sambhaji Bhide Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्यभर निषेध आंदोलने होत असतानाच भिडे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भिडेंचे नाव याचिकेतून वगळण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राज्यभरात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून भिडेंना त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या पावासाळी अधिवेशनातही संभाजी भिडे यांच्या वक्तव्याप्रकरणी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Sambhaji Bhide
Ambadas Danve- Bhumre News : पालकमंत्री आहात, जहागीरदार समजू नका ; दानवेंनी भुमरेंना ठणकावले..

भिडेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अमरावतीत गुन्हा दाखल झाला होता. यानंतर भिडे यांच्याविरोधात कुमार महर्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने अनेक सवाल उपस्थित केले.

Sambhaji Bhide
Ashish Shelar On Nana Patole: नाना, मुख्यमंत्री होण्याआधी आमदार व्हा ; शेलारांनी पटोलेंना काढला चिमटा..

अशा प्रकारची अनेक प्रकरणं असताना केवळ संभाजी भिडे यांच्या विरोधातच याचिका का?, असा सवाल करत जनहित याचिका फक्त एका व्यक्तीविरोधात होऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवत संभाजी भिडे यांचे नाव याचिकेतून वगळण्याचे निर्देश दिले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com