Ashish Shelar On Nana Patole: नाना, मुख्यमंत्री होण्याआधी आमदार व्हा ; शेलारांनी पटोलेंना काढला चिमटा..

Nana Patole News : मी मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल....
Nana Patole, Ashish Shelar
Nana Patole, Ashish Shelar Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पटोलेंच्या या इच्छेवरून भाजपने त्यांची खिल्ली उडवली . भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी पटोलेंना डिवचलं. शेलार आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.

"नाना, तुम्ही मुख्यमंत्री होण्याआधी आमदार तर बना," असा टोला शेलारांनी लगावला आहे. पटोलेंनी रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमधील एका दर्ग्यावर चादर चढवली. यावेळी पटोलेंना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता त्यांनी हे विधान केले.

Nana Patole, Ashish Shelar
Rahul Gandhi Lok Sabha Membership : 'इंडिया'चे राहुल गांधी संसदेत काय बॅटिंग करणार...; मोदींना घेरणार ?

"मी मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर ती पूर्ण होवो," असे विधान काल (रविवारी) पटोले यांनी केले आहे. "आम्ही इतरासारखा दिखावा करीत फिरत नाही. सध्या श्रावण महिना सुरू आहे. हिंदू संस्कृतीमध्ये हा महिना धार्मिक समजला जातो. मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात धार्मिक भावना दुखविण्याचे कोणतेही काम होत नाही, " असे पटोले म्हणाले.

Nana Patole, Ashish Shelar
Ashish Shelar ON Uddhav Thackeray : ठाकरे कितीही विषारी बोलत असले तरी त्यांच्या घरी साप कोणी सोडू नये ; शेलारांचा टोला

यावेळी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर पटोलेंनी टीका केली. "अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, हे अध्यक्षांनाही माहित नाही, सध्या लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. काँग्रेस हे सर्व मुद्दे जनतेच्या दरबारात मांडणार आहेत. हे बधीर सरकार असून ते भय व भ्रष्टाचाराच्या बळावर चालते," असा आरोप पटोलेंनी केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com