Hasan Mushrif News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांना दिलासा ; उच्च न्यायालयाने ED ला दिला हा आदेश

Hasan Mushrif : पुढील सुनावणी होईपर्यंत अटक करु नका..
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif News update : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (NCP Leader Hasan Mushrif) यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अटकेपासून 27 एप्रिल पर्यंत त्यांना दिलासा देण्यात आला आहे.

ईडी कडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यानुसार आता पुढील सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ यांना अटक करु नये, असे आदेश दिले आहेत.

Hasan Mushrif
Pune New Municipal Corporation: नवी महापालिका घोषित करण्यासाठी ही योग्य वेळ ; पुणे पालिकेकडून सरकारनं मागविला अभिप्राय

लोकसहभागातून २०११ मध्ये हसन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेडची स्थापना केली होती. यासाठी शेअर्सच्या रुपात शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेतले होते, असा दावा ईडीने केला आहे.

Hasan Mushrif
FIR Filed Against Rahul Gandhi: राहुल गांधींचा पाय खोलात ; सावरकरांच्या नातवानंतर आता एका वकीलाकडून तक्रार दाखल

याप्रकरणी आतापर्यंत १०८ शेतकऱ्यांनी कोल्हापूर पोलीस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासदत्व देतो, असे सांगून मुश्रीफांनी फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील दाखल गुन्ह्याबाबत मुश्रीफांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने २४ एप्रिलपर्यंत कोणीतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com