दरेकरांच्या अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयाकडून मोठा झटका

मुंबै बँक निवडणूक फसवणूकप्रकरणी दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात दरेकर यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSarkarnama

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबै बँक निवडणूक फसवणूकप्रकरणी दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात दरेकर यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नकार दिला आहे. या गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकरांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे दरेकरांना मोठा झटका बसला आहे. (Mumbai Bank Case)

दरेकरांवर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरेकर यांना या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती. 'या नोटिशमध्ये 'आपण मजूर आहात की नाही,' अशी विचारणा करण्यात आली होती. याशिवाय यापूर्वीच प्रवीण दरेकर मजूर नसल्याचे सांगत त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

Pravin Darekar
फडणवीस हा मुद्दा उपस्थित करतील असे वाटले नव्हते; अजितदादांची विधानसभेत नाराजी

मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. असे म्हणतं मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे,'' असे आदेश उच्च न्यायालयाकडूनही देण्यात आले होते. त्याअनुषंगाने मुंबई पोलिसांनी दरेकरांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दरेकरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या गुन्ह्यात आपल्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करण्यास मनाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. पण ही याचिका न्यायालयाने बुधवारी फेटाळली आहे. दरम्यान, ही याचिका तांत्रिक मुद्यावरून फेटाळण्यात आल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते. तसेच त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विधान परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. सहकार विभागाने दरेकर यांना अपात्र ठरवताना याच बाबींकडे लक्ष वेधत तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असे आपल्या आदेशात स्पष्ट केले होते.

Pravin Darekar
हेमा मालिनी यांचा मोदी सरकारला संसदेतच घरचा आहेर; म्हणाल्या...

दरेकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले होते. सर्वच पक्षातील नेते मजूर संस्थांमध्ये अध्यक्ष असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी गुलाबराव देवकर यांचंही नाव घेतलं होतं. तसेच याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com