Devendra Fadanvis : मला काय मिळणार...; फडणवीसांचे पदाधिकारी, आमदारांना मोलाचे सल्ले

आमच्यासाठी महापुरुष हे कालही आदर्श होते आणि आजही आहेत.
Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis Newssarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadanvis News : अडीच वर्षे सरकारकडून मला काही मिळेल हे बघणे सोडा. आपली त्यागाची तयारी ठेवा. मला काय मिळणार हे मनातून काढून टाका. आपल्याला लोक कशाप्रकारे जास्त जागा देतील याकडे लक्ष द्या. आपल्याला काही मिळेल की नाही अशी भावना असेल तर कार्यक्षमता आपली संपते. त्यामुळे दोन वर्षात माझ्या सरकारला यशस्वी करणार, ही भावना आली पाहिजे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी आणि आमदारांना सल्ला दिला.

फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सोमवारी (१९ डिसेंबर) सायंकाळी भाजप पदाधिकारी आणि आमदारांच्या बैठक पार पडली. यावेळी फडणवीसांनी आमदार आणि पदाधिकांऱ्याना महत्त्वाच्या सूचना आणि सल्ले दिले.

Devendra Fadanvis News
Gram Panchayat Election Result: कुणाच्या गळ्यात विजयाची माळ तर कुणाला पराभवाचा धक्का ? आज स्पष्ट होणार

आता आपलं सरकार येऊन पाच महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. गेली अडीच वर्षे लकवा सरकार होते. आपले निर्णय स्थगित केले होते. कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. पण आपलं सरकार आले तेव्हा शेतकऱ्यांना मदत दुप्पट केली. केवळ सहा महिन्यात शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आपलं आहे. आपलं सरकार धडाडीने काम करत आहे. पण ही धडाडी मॅच करता येत नाही आणि बोलता येत नाही त्यामुळे विरोधी पक्ष अनेक असे विषय मोठे करतात जे वस्तुतः निव्वळ राजकारण करताना दिसतात, अशी टिकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

आज ते महापुरुषांबद्दल केलेल्या अपमानाविरोधात नारे देत होते. पण आमच्यासाठी महापुरुष हे कालही आदर्श होते आणि आजही आहेत. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांना पुरावे मागण्याची यांची हिंमत होते ते आज घोषणा देत आहेत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. आपल्या सोयीचे नाही तर गप्प बसू असा दुटप्पी भाव आपल्याला पहायला मिळत आहे.

ज्यांनी खिल्ली उडवली त्याच लोकांना मंचावर घेऊन मोर्चा काढला जातो. सात पक्ष एकत्र आले तरी 15 ते 20 हजार लोक जमवू शकले नाही म्हणून हा नॅनो मोर्चा होता. निव्वळ राजकारण करण्यासाठी मोर्चे काढले जातात. लोकांना पैसे वाटत होते तो व्हिडिओ आमच्या केशव उपाध्ये यांनी ट्विट केला होता. जे लोक आले होते त्यांना आपण कशासाठी आलो हे माहीत नव्हते. आपल्याशी लढण्याची विरोधकांमध्ये दम नाही. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com