Mumbai Blast Threat: मुंबईत ब्लास्ट करणार; मुंबई पोलिसांना धमकी

Threat To Mumbai Police: पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Mumbai Police
Mumbai PoliceSarkarnama

Mumbai Police: मुंबई पोलिसांना (Mumbai Police) ट्विटरवरुन धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत लवकरच ब्लास्ट करणार असल्याची धमकी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत पोलिसांना अशा धमक्या थेट फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून येत होत्या. पण आत थेट एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ माजली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (22 मे) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्विटर अकाऊंटवर "मी लवकरच मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे" असा संदेश पाठवला होता. हा संदेश इंग्रजी भाषेत लिखित स्वरूपात पाठवण्यात आला होता, "I m gonna blast the mumbai very soon." हा संदेश गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Police
Raut VS Rane : ''राऊत आतापर्यंत चारवेळा खासदार, तेही एकाच पक्षातून; तुम्ही...!''; ठाकरे गटाच्या नेत्यानं राणेंना फटकारलं

२६/११ सारख्या हल्ल्या सारख्या धमक्या

इतकेच नव्हे तर, रविवारीदेखील (21 मे) एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून 26/11 हल्ल्याप्रमाणे शहरात दहशत माजवणार असल्याची धमकी दिली होती. पोलिसांना हा संशयास्पद कॉल राजस्थानमधून आला होता. त्यानंतर राजस्थान पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणावर तात्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांनी एकाला अटक केली. (Crime News)

Mumbai Police
Pune Loksabha By Election : मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

त्यानंतर राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव देवेंद्र तन्वर असून तो अजमेरचा रहिवासी आहे. तसेच देवेंद्र हा मानसिक रुग्ण असून त्याने रागाच्या भरात मुंबई पोलिसांना फोन केल्याची माहिती राजस्थान पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com