Nalasopara Police Inspector Bribe Case: 'आरोपीला जामीन देतो, एक लाख रूपये पोहोचवा'; पोलीस इंस्पेक्टर सापळ्यात अडकला!

Nalasopara Police Inspector Bribe News: आम्हाला वरपर्यंत पैसे द्यावे लागतात, पोलिस इंस्पेक्टरवर गुन्हा दाखल !
Bribe Case  Nalasopara Police Inspector Bribe News : Ramchandra shendage
Bribe Case Nalasopara Police Inspector Bribe News : Ramchandra shendageSarkarnama
Published on
Updated on

Nalasopara Police Inspector Bribe News : एक आरोपीला जामीन मिळवून देतो, त्याबदल्यात १ लाखाची लाचेची मागणी (Bribe News) करणाऱ्या तुळींज पोलीस ठाण्यातील (Tulij Police Station) पोलीस उपनिरीक्षकावर आता गुन्हा दाखल (Nalasopara police Inspector bribe) झाला आहे. रामचंद्र शेंडगे असं या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Thana ACB News) मंगळवारी उशिरा रात्रीच्या दरम्यान हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

Bribe Case  Nalasopara Police Inspector Bribe News : Ramchandra shendage
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : दंगल प्रकरणी नितेश राणे यांनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी करा..

ज्यांनी शेंडगे यांच्याविरूद्ध तक्रार दिली, त्यांचा केटरिंग आणि मंडप सजावटीचा व्यवसाय आहे. तुळींज (Police) पोलीस ठाण्यात फिर्यादींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या केसचा तपास लाचखोर पोलीस निरीक्षक रामचंद्र शेंडगे यांच्याचकडे होता. (Latest Marathi News)

दरम्यान, आरोपीला या केसमधून जामीन मिळवून देतो, त्यासाठी पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी तब्बल एक लाख रूपयांची लाचेची मागणी फिर्यांदीकडून केली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा करताना, प्रत्येक ठिकाणी आम्हाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पैसे द्यावेच लागतात, असेही निरीक्षक शेंडगे यांनी सांगितल्याचा आरोप आहे.

Bribe Case  Nalasopara Police Inspector Bribe News : Ramchandra shendage
Chandrakant Patil News: किशोर आवारेंचे खूनी सुटणार नाहीत; चंद्रकांत पाटलांचा आवारे कुटुंबियांना शब्द !

लाचेची मागणी झाल्यानंतर आता फिर्यादीने ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी एक लाख रूपयाची साच मागितली, हे स्पष्ट झाले होते. त्यांना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले एसीबीला यश आले. यामुळे त्यांच्यावर आता लाच मागितल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com