Chandrakant Patil News: किशोर आवारेंचे खूनी सुटणार नाहीत; चंद्रकांत पाटलांचा आवारे कुटुंबियांना शब्द !

Chandrakant Patil Meets Kishor Aware Family Members: "मी स्वत: यामध्ये लक्ष घालणार आहे.."
Chandrakant Patil :
Chandrakant Patil :Sarkarnama

Pune News : "किशोर आवारे (KIshor Aware) हा एक चांगला सामाजिक कार्यकर्ता होता, गरिबांची, दीनदुबळ्या, सर्वसामान्यांची कामे करत होता. आवारेंची झालेली हत्या हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. ही हत्या ज्यांनी केली, त्यांच्यापैकी कुणीही सुटणार नाहीत. जे कोणी आवारेंच्या हत्येला दोषी आहेत, त्यांना कठोर शासन होणार, त्यासाठी मी स्वत: यामध्ये लक्ष घालणार आहे," असा शब्द राज्याचे मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आवारेंच्या कुटुंबियांना दिली.

चंद्रकांत पाटील यांनी मंगळवार (ता. १६) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) या ठिकाणी मयत किशोर आवारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, याबाबत जे कोणी दोषी असतील त्यांना लवकरच कडक शासन करणार, असे आश्वस्त केले. आवारे कुटुंबियांचे सांत्वन करताना चंद्रकांत पाटील भावुक झाले होते.

Chandrakant Patil :
Kishor Aware Murder case Update: किशोर आवारे हत्या प्रकरणात नवी अपटेड: न्यायालयाचे महत्वाचे आदेश

यावेळी स्थानिक नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप जिल्हा-अध्यक्ष गणेश भेगडे, भाजप पदाधिकाचे राजेंद्र जांभुळकर, चंद्रकांत शेटे, किरण राक्षे उपस्थित होते. यावेळी किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे, त्यांची पत्नी विद्या आवारे, बंधू रवींद्र आवारे, कन्या प्रियंका आवारे, मामा बाळासाहेब काकडे, रामदास काकडे, गणेश काकडे यांनी किशोर आवारेंच्या खून्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

Chandrakant Patil :
Karnataka CM : कर्नाटक CM च्या घोषणेस उशीर का ? ; काँग्रेसने दिली भाजपची दोन उदाहरणे..

काय आहे प्रकरण ?

तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषद कार्यालयासमोर दि. १२ मे रोजी भर दुपारी जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware Killed) (वय ५०) यांची चार हल्लेखोरांनी निर्घूण हत्या केली. जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय आहे. (Pune Crime News)

या खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke), त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार सुनील शेळके यांनी किशोर आवारेंचा खून केल्याचा आरोप आवारेंच्या आईंने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com