Sanjay Raut News : 'बीआरएस'च्या माणिक कदमांचा संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले, "आमचा..."

BRS and Raut : 'बीआरएस'मुळेच राज्य सरकार जागे झाले
Sanjay Raut, Manik Kadam
Sanjay Raut, Manik KadamSarkarnama

BRS Attack on Sanjay Raut : तेलगंण राज्यातील सत्तेत असलेला पक्ष महाराष्ट्र राज्यात आपले हातपाय पसरू लागला आहे. या पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी 'अब की बार शेतकरी सरकार' असा नारा दिला होता. (Latest Marathi News)

'बीआरएस'मध्ये राज्यातील विविध पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. राज्यातून या पक्षात 'इनकमिंग' मोठ्या प्रमाणत होत आहे. यात माजी आमदारांचाही समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्यासाठी राव यांनी खास विमान पाठवून त्यांना हैदराबादला चर्चेसाठी बोलावले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी 'बीआरएस'वर बोचरी टीका केली.

Sanjay Raut, Manik Kadam
Ganesh Sugar Factory : नगरमधील कारखाने शेकडो कोटींनी तोट्यात कसे? काळेंचा विखे, थोरात, कोल्हेंना थेट सवाल

'बीआरएस' ही भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते म्हणाले, "बीआरएस आणि भाजपची छुपी युती आहे. 'बीआरएस' भाजपची बी टीम आहे." राऊतांच्या या टीकेचा 'बीआरएस'च्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम यांनी समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी आमच्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाल्याचा दावा केला.

Sanjay Raut, Manik Kadam
Shridhar Patankar ED Raid : उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकरांच्या कार्यालयावर छापे; सोमय्या म्हणाले..

माणिक कदम (Manik Kadam) म्हणाले, "राऊतसाहेब आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतरच भाजप सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतरच भाजप सरकारने एका शेतकऱ्याला वर्षांमध्ये सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली, हे विसरू नका. आमचा समझोता फक्त शेतकऱ्यांशी आहे. संजय राऊत तुम्ही आतापर्यंत कुठे होता?"

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com