ED Action On Anil Ramod: सीबीआयनंतर आता अनिल रामोडावर 'ईडी'ची वक्रदृष्टी?

Anil Ramod ED News: रामोड यांच्याकडे तब्बल 6 कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्ता..
ED Action On Anil Ramod :
ED Action On Anil Ramod : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना ९ जून रोजी लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले होते. ही कारवाई 'सीबीआय'ने केली होती. (CBI Action) त्यांना आठ लाख रुपायांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. आता रामोड यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे.

ED Action On Anil Ramod :
CBI Raid on Anil Ramod : अनिल रामोडांचा ठरला होता रेट; भूसंपादनाच्या एक कोटीच्या मोबदल्यावर द्यावे लागत होते दहा लाख !

अनिल रामोड यांच्या कार्यालयासह बाणेर (पुणे) आणि नांदेड येथील घरांवर 'सीबीआय'ने छापे टाकले होते. या कारवाईत 'सीबीआय'च्या हाती मोठे घबाड लागल्यामुळे रामोडची राज्यभर खूप चर्चा झाली. छापा टाकल्यानंतर रामोड यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या कारवाईमुळे महसूल विभागासह राज्यात खळबळ उडाली आहे.

अनिल रामोड यांना पालखी महामर्गासाठी भूसंपादनच्या मोबदल्यातील लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोबदला देण्यासाठी त्यांनी दरपत्रक काढल्याचा तक्रारदार अॅड. याकूब साहेबू तडवी यांनी केला होता. यावेळी त्यांनी रामोडांच्या एक कोटी रुपये मोदबदल्याच्या बदल्यात १० लाख रुपये लाच घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, रामोड यांच्या पुणे आणि नांदेड येथील घरातून मोठ्या प्रमाणत बेहिशेबी रोकडसह संपत्ती हाती लागली आहे.

ED Action On Anil Ramod :
Anil Ramod CBI Enquiry: अनिल रामोडांचा पाय खोलात; सीबीआयला मिळाले धागेदोरे, 'या' प्रकरणाची होणार चौकशी

अनिल रामोडांवर सीबीआयने कारवाई केल्यानंतर आता ईडी म्हणजे सक्तवसुली संचलनालयाचा फेरा रामोडांकडे वळणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता रामोडांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता असून, त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com