Cabinet Meeting update : दणक्यात विजय मिळवताच फडणवीसांचे 'कॅबिनेट'मध्ये महत्वाचे निर्णय; शिंदे, पवारांच्या अनुपस्थितीत मुंबईकरांना दिला मोठा दिलासा...

Chief Minister Devendra Fadnavis took crucial decisions : राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'महिमा' ही संस्था स्थापन केली जाणार आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra cabinet decisions : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने विजय मिळवत उद्धव ठाकरेंची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. त्यानंतर काही तासांतच मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.    

मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध होणार आहेत. मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिव प्रकल्पास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर हा मुंबईसाठी पहिला मोठा निर्णय आहे. या निर्णयानुसार मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार आहेत.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा – २ (एमयुटीपी - २) साठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
BMC Mayor : मुंबईत महापौर कोण? ‘या’ नावांपैकी एक फिक्स, CM फडणवीस देणार धक्का?

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यासाठीही महत्वाचा निर्णय़ फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे सर्वोपयोगी-मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य कृषि पणन महामंडळाला ७ हेक्टर ९६.८० आर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लॅंट विकिरण, पॅक हाऊस सविधा तसेच फळे-भाजीपाला साठवणुकीकरिता सुविधांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
BMC Election Result : निकालानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; बड्या नेत्यानं घातला पहिला घाव, वर्षा गायकवाड राजीनामा देणार?

युवकांसाठी महत्वाचा निर्णय

राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था (महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँन्ड अँडव्हान्समेंटस्-महिमा) स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रशिक्षित, कुशल युवकांना जगभरातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी समन्वय व अंमलबजावणीसाठी ही संस्था काम करणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com