Shikshak-Padavidhar Election : शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

Shikshak-Padavidhar Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
Shikshak-Padavidhar Election
Shikshak-Padavidhar Election Sarkarnama

Shikshak-Padavidhar Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. नाशिक, अमरावती (Amravati) पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. यातील तीन मतदार संघांसाठी भाजपने (BJP) आपले उमेदवार जाहीर केली आहेत.

या संदर्भात आज ता(. ९) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तीन मतदार संघातील भाजपचे उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून रणजीत पाटील यांना तर मराठवाडा शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या पाच सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Shikshak-Padavidhar Election
Shinde Government News : महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग 'या' सरकारच्या कार्यकाळात ; गुजरात, उत्तरप्रदेशालाही मागे टाकले..

दरम्यान, पाच जागांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 1, भाजप 1, काँग्रेस (Congress) 1, शेकाप 1 आणि एका जागेवर अपक्ष आहे. शेकापची जागा काँग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. नाशिकमधून काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावतीमधून भाजपचे (BJP) रणजीत पाटील, औरंगाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, आणि कोकणातून शेकापचे बाळाराम पाटील व नागपूरमधून नागो गाणार हे 2017 मध्ये विजयी झाले होते. अर्ज सादर करण्यासाठी 17 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली असून अर्जांची छाननी 18 जानेवारी रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com