आता सहन नाही होत; मनसे आमदार राजू पाटलांच गडकरींना आवाहन

Raju Patil : राजू पाटलांनी नागरिकांची व्यथा गडकरींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
Nitin Gadkari & Raju Patil Latest News
Nitin Gadkari & Raju Patil Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनानंतर केंद्र सरकारने कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सीट बेल्टबाबत घोषणा केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्राने ही घोषणा केली असताना मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सीटबेल्ट बांधणे सुरक्षेच्या दृष्टीने जसे अनिवार्य केले आहे. तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याची तरतूद करा,अशी मागणी ट्विटरद्वारे मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ठेकेदारांचा गलथानपणा आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे रस्त्यांची दुरावस्था असून खड्ड्यांनी देखील नागरिकांचे जीव जात आहेत याकडे आमदार पाटील यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधू केले आहे. (Nitin Gadkari & Raju Patil Latest News)

Nitin Gadkari & Raju Patil Latest News
नाना पाटेकरांच्या घरी मुख्यमंत्री शिंदे रमले तब्बल दीड तास; जेवण अन् रंगली गप्पांची मैफिल

पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात टाटा सन्सचे मिस्त्री यांचा मृत्यु झाला. सीटबेल्ट न लावल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही आता सीट बेल्ट लावणे बंधनकारक असल्याची घोषणा केली आहे. यावर आमदार राजू पाटील यांनी ट्विट केले असून त्यांचे ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने रस्ते अपघातात नागरिकांचे जीव जातात. परंतू रस्त्यांची दुरावस्था ही देखील काही अपघातांना कारणीभूत असून पालघर, ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे त्यांनी मंत्री गडकरी यांचे लक्ष ट्विटरद्वारे वेधले आहे.

Nitin Gadkari & Raju Patil Latest News
सिब्बलांनी एक युक्तिवाद केला अन् ठाकरेंना दिलासा मिळाला...

अनेक जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेक वाहनांचा तोल जाऊन अपघात घडत आहे. काही अपघातात नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या अपघातांना रस्ते जसे कारणीभूत आहेत, तसेच रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार आणि अधिकारी देखील तेवढेच कारणीभूत आहेत.

निधी लाटण्याच्या नादात निकृष्ट दर्जाची केली जाणारी कामे, अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची होणारी हेळसांड हे सांगण्याचा प्रयत्न आमदार पाटील यांनी केला आहे. गडकरींना हे ट्विट त्यांनी टॅग केले असून, रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याची ही तरतूद करा,अशी मागणी करत आता सहन होत नाही, अशा शब्दांत त्यांनी नागरिकांची व्यथा मंत्री गडकरींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Nitin Gadkari & Raju Patil Latest News
राष्ट्रवादीच्या डॉ. अंबिकेंनी लक्ष्मण भाऊंच्या प्रेमापोटी भाजपमध्ये केला प्रवेश

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने जसं सीटबेल्ट बांधणं अनिवार्य केलं आहे तसंच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय ! @nitingadkari आता सहन नाही होत,अशा शब्दात त्यांनी गडकरी यांना आवाहन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com